नांदेड जिल्ह्यात तुतीची ३२४ एकरांवर नोंदणी

नांदेड : ‘महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत ३२४ एकरवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
Mulberry in Nanded district Registration on 324 acres
Mulberry in Nanded district Registration on 324 acres

नांदेड : ‘महारेशीम अभियानांतर्गत जिल्ह्यात आजपर्यंत ३२४ एकरवर तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. यात ‘मनरेगा’ तसेच ‘पोकरा’अंतर्गत शेतकऱ्यांचा समावेश आहे, माहिती जिल्हा रेशीम कार्यालयातून मिळाली.

जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांच्या संकल्पनेतून रेशीम उद्योगाला चालना मिळावी, यासाठी कृषी संलग्न असलेला तुती लागवड व्यवसायाला प्राधान्य देण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरविले आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील २ हजार एकरवर तुती लागवडीचे नियोजन आहे.

जिल्ह्यातील वातावरण रेशीम उद्योगास पोषक आहे या रेशीम उद्योगाला वाव मिळावा, या साठी मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यात तुतीची लागवड करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना फिरत्या रथातून मार्गदर्शन करण्यात येत आहे. परिणामी आजपर्यंत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) अंतर्गत ८७ शेतकऱ्यांनी ८७ एकरासाठी नोंदणी केली. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत २३७ शेतकऱ्यांनी ३२७ एकरासाठी नोंदणी केली आहे. यात नांदेड तालुक्यातील जैतापूर, तुप्पा, पाटनूर, धामदरी व लोणी या पाच गावांत ४० एकरवर नोंदणी आहे. 

लोहा तालुक्यातील मदमाची वाडी, पेनूर, हाडोळी, रिसनगाव, जोमेगाव, लोहा, चितळी यात सात गावांत ६५ एकरावर नोंदणी झाली आहे. कंधार तालुक्यातील बिजेवाडी, गोणार, दहिकळंबा या गावांत ३५ एकर, हदगाव तालुक्यातील पांगरी व येवली येथे १८ एकर, किनवट तालुक्यातील आंदबोरी येथे १८ एकर, भोकर तालुक्यातील एकधरी, लगळूद, वाकद, चिदगिरी या गावांत ५४ एकर, हिमायतनगरमधील पारवा बु. व मोटरगा या गावात १९ एकरची नोंदणी आहे. 

रोपे तयार करण्यास गती

मुदखेड तालुक्यातील डोंगरगाव व पार्डी वैजनाथ या गावात १२ एकर, देगलूर तालुक्यातील सोमून व येडून येथे २३ एकर, बिलोली तालुक्यातील किन्हाळा येथे १५ एकर, तर नायगाव तालुक्यातील ताकबिड, मांजरम, नरसी, सागंवी या गावांत २३ एकर अशा एकूण ३२४ एकरांवर नोंदणी झाली आहे. आता शेतकरी तुतीची रोपे तयार करत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com