Agriculture news in marathi Mulberry on ten thousand five hundred acres in Marathawada | Agrowon

मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुती

टीम अॅग्रोवन
बुधवार, 11 डिसेंबर 2019

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत १० हजार ६७१ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत नव्याने झालेली लागवड व जुनी तुती लक्षात घेता काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. 

दुष्काळाच्या आघाताने गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात तुतीचे क्षेत्र थोडे घटले. तरी पुन्हा एकदा दहा हजार एकरपुढे क्षेत्र झालेल्या मराठवाड्यात सावरत असल्याचे चित्र आहे. शिवाय अलीकडे कोषाच्या दरातील तेजीही रेशीम उद्योगाकडे आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे डिसेंबरपासून पुन्हा पुढील वर्षाच्या तयारीसाठी महारेशीम अभियानाची तयारी केली जाणार आहे. 

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर अखेरपर्यंत १० हजार ६७१ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत नव्याने झालेली लागवड व जुनी तुती लक्षात घेता काही प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. 

दुष्काळाच्या आघाताने गतवर्षीच्या तुलनेत मराठवाड्यात तुतीचे क्षेत्र थोडे घटले. तरी पुन्हा एकदा दहा हजार एकरपुढे क्षेत्र झालेल्या मराठवाड्यात सावरत असल्याचे चित्र आहे. शिवाय अलीकडे कोषाच्या दरातील तेजीही रेशीम उद्योगाकडे आकर्षित करीत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे डिसेंबरपासून पुन्हा पुढील वर्षाच्या तयारीसाठी महारेशीम अभियानाची तयारी केली जाणार आहे. 

मराठवाड्यात गतवर्षी रेशीम उद्योगांतर्गत जळपास ११ हजार एकरपुढे तुतीची लागवड झाली होती. यंदा सुरुवातीला दुष्काळाचा आघात व त्यानंतर पावसाच्या लहरीपणामुळे तुती लागवडीत व्यत्यय निर्माण झाला. त्यावर मात करत रेशीम कोष उत्पादकांनी बाद झालेल्या ठिकाणी व नवीन ठिकाणी तुतीची लागवड करून घटणाऱ्या क्षेत्रातील तफावत कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. 
प्राप्त माहितीनुसार १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान मराठवाड्यात १० हजार २५३ शेतकऱ्यांनी १० हजार ६७१ एकरवर तुतीची लागवड केली.

३० नोव्हेंबर अखेरपर्यंत जुन्या तुती लागवडीपैकी ७४२० एकर क्षेत्र तुती शिल्लक होती. यंदा नव्याने लागवडीचा ५४०० एकरचा लक्षांक देण्यात आला होता. गत पंधरवड्यात अखेरच्या अहवालानुसार २९३५ एकरवर तुतीची लागवड करण्यात आली. त्यामुळे मराठवाड्यातील एकूण तुतीचे क्षेत्र १० हजार ६७१ एकरवर पोचले आहे. गतवर्षी १ एप्रिल ते ३० नोव्हेंबर २०१९ दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ५६२२ एकरवर तुतीची लागवड झाली होती, अशी माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली. 

३३९४ एकरांवरील तुती बाद

मराठवाड्यात दुष्काळाच्या संकटाने जवळपास ३३९४  एकरांवरील तुती लागवड बाद झाली आहे. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ८२७ एकर, जालना ७८०, परभणी ३८७, हिंगोली ३२९, नांदेड २२५, लातूर ५१२, उस्मानाबाद ५६६, तर बीड जिल्ह्यातील ३१३ एकरवरील तुती बाद झाली आहे. दुष्काळात साथ देणारे पीक म्हणून  तुतीकडे पाहिले जात असताना त्यावर आलेले संकट दुष्काळाची तीव्रता अधोरेखित करण्यास पुरेशी आहे. 

जिल्हानिहाय तुतीचे क्षेत्र व शेतकरी संख्या

जिल्हा  शेतकरी  क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)
औरंगाबाद १६९० १६९०
जालना  १६०१ १६१२
परभणी ५५५ ३९८
हिंगोली ८४६ ८८७
नांदेड ७९७ ९६५
लातूर  ७३१  ७८५
उस्मानाबाद १६८१ १७३१.५
बीड २३५२ २६०३

 


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...