Agriculture news in Marathi, Multi-dimensional project for the development of farmers in Odisha | Agrowon

ओडिशातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी बहुआयामी प्रकल्प
टीम अॅग्रोवन
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

भुवनेश्‍वर ः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ओडिशा सरकारने बुधवारी राज्यात कृषी विकासासाठी बहुआयामी पायलट प्रकल्प सुरू केला. 

आदिवासीबहुल नबरंगपूर जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५.२१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रकल्पाचे उद्‌घाटन केल्यानंतर सांगितले. 

भुवनेश्‍वर ः विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी ओडिशा सरकारने बुधवारी राज्यात कृषी विकासासाठी बहुआयामी पायलट प्रकल्प सुरू केला. 

आदिवासीबहुल नबरंगपूर जिल्ह्यात हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५.२१ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जीवन सुधारण्यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे, असे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रकल्पाचे उद्‌घाटन केल्यानंतर सांगितले. 

राज्य सरकारने विज्ञान आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर), भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), बायो टेक्नॉलॉजी विभागाच्या अंतर्गत १२ वेगवेगळ्या संशोधन व विकास प्रयोगशाळांसह करार केला आहे. राज्य सरकारची तब्बल १५ विभाग केंद्रीय संस्थांच्या अनुषंगाने काम करतील. या प्रकल्पाचे उद्दिष्ट शेतीला फायदेशीर व्यवसाय बनविणे आहे. यामुळे फलोत्पादन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन आणि सुगंधित उद्योगातील शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्यांची क्षमता वाढविण्यात मदत होईल, असे पटनायक म्हणाले. 

या उपक्रमांतर्गत, अधिक उत्पन्न देणारी फळे आणि भाज्या, व्यावसायिक रोपवाटिकांची स्थापना, हळद, गवती चहा आणि आवश्यक तेले यांसारख्या सुगंधी कृषी उत्पादनांसह अनेक उपक्रम हाती घेण्यात येतील, असे एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून अगरबत्ती आणि जैव खते, मत्स्यपालन, पाणीउपसा प्रकल्प आणि कुक्कुटपालनाचे उत्पादनही घेण्यात येईल, असे या पत्रकात म्हटले आहे. कृषी व शेतकरी सशक्तीकरण मंत्री अरुणकुमार साहू म्हणाले, गवती चहातून सुगंधी तेल कसे काढता येईल व चांगल्या नगदी पिकांचे उत्पादन कसे घेता येईल, यावर शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहोत.

इतर ताज्या घडामोडी
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...
सांगली जिल्ह्यात २० टक्के क्षेत्रावर...सांगली  ः गेल्या आठवड्यात झालेला पाऊस,...
पुणे जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरीपुणे : जिल्ह्याच्या सर्वच भागांत दोन-तीन...
अमेरिकेमध्ये कपाशीवर विषाणुजन्य ब्ल्यू...अमेरिकेमध्ये कपाशीवर प्रथमच विषाणूजन्य ब्ल्यू...
नगर जिल्ह्यात अजूनही १४२ टॅंकर सुरूचनगर ः पावसाळा संपला असला तरी अजूनही जिल्ह्यातील...
पावसामुळे लांबला कापसाचा हंगामराळेगाव, जि. यवतमाळ ः अति पावसामुळे कापसाचा हंगाम...
जळगाव, पुणे जिल्ह्यात ईव्हीएम, ...जळगाव  ः जिल्ह्यात सोमवारी मतदानाच्या दिवशी...
सोलापूर जिल्ह्यात पावसाचा पहिल्यांदाच...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात गेल्या दोन...
कोयनेसह पाच धरणांतून विसर्गसातारा  ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत...
जिल्हा बँकांबाबत अनास्कर यांनी ...पुणे  : राज्यातील शेतकऱ्यांच्या घामाच्या...
कपाशीवरील दहिया रोगाचे एकात्मिक...कपाशीचे पीक हे साधारणतः सहा महिने किंवा...
गुलटेकडीत गाजर, पावट्याच्या दरात सुधारणापुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
कृषी सल्लाकापूस अवस्था ः फुले उमलणे ते बोंडे धरणे फुलकिडे...
जळगावात केळी दरात सुधारणा; आवक रोडावलीजळगाव ः केळीची आवक गेल्या आठवड्यात रोडावलेलीच...
कळमणा बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढलीनागपूर : जुन्यानंतर आता हंगामातील नव्या सोयाबीनची...
नाशिकमध्ये हिरवी मिरची १२०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...