‘गोकुळ’ मल्टिस्टेटचा प्रस्ताव सत्तारूढ गटाने गुंडाळला 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

कोल्हापूर  : राज्यातील सर्वांत मोठा सहकारी दूध प्रकल्प असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ) बहुराज्य संस्था नोंदणीचा (मल्टिस्टेट) प्रस्ताव सत्तारूढ गटाने स्वतःहून गुंडाळला आहे.   या विरोधात जोरदार जनमत उभे राहिल्याने संचालक मंडळावर ही वेळ आली आहे.  

संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी सोमवारी (ता. २८) एक पत्रक काढून सभासदांच्या भावना लक्षात घेत  सेंट्रल रजिस्ट्रारकडे नोंदणीसाठी पाठवलेला मल्टिस्टेटचा प्रस्ताव सध्या रद्द करण्यात येत आहे, असे म्हटले आहे. आमदार सतेज पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून ‘गोकुळ’ विरोधातील अपप्रवृत्ती, गैरव्यवहाराविरोधात दूध उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन केलेल्या दोन वर्षांच्या लढ्याला यश आल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

गोकुळ दूध संघ बहुराज्य करण्याचा सत्तारूढ गटाचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांचा प्रयत्न आहे. गतवर्षी ३० ऑक्टोबरला झालेल्या संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकऱ्यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध केला होता. सभेत या प्रस्तावावरून मोठा राडा झाल्याने अवघ्या तीन मिनिटांतच सभा गुंडाळण्याची वेळ सत्तारुढ गटावर आली होती. यावरून बऱ्याच राजकीय घडामोडी झाल्यानंतर अखेर हा प्रस्ताव गुंडाळण्याचा निर्णय सत्तारूढ गटाने घेतला आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com