agriculture news in Marathi mumbai apmc started Maharashtra | Agrowon

मुंबई बाजार समिती सुरू, पुणे कधी?

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 एप्रिल 2020

'सकाळ-ॲग्रोवन'च्या पाठपुराव्यामुळे मुंबई बाजार समिती सुरू होत असल्याने शेतमालाला उठाव मिळून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मुंबई नंतर पुणे बाजार समिती देखील सुरू होण्यासाठी पोलीस, बाजार समिती आणि महसूल प्रशासनाने समन्वयाने अधिक प्रयत्न करावेत.
— राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

पुणे : शेतकऱ्यांना बाजार व्यवस्थेचा पर्याय न देताच बाजार समित्या बंद केल्यानंतर भाजीपाला, फळांचे अतोनात नुकसान होत आहे. अशातच आशिया खंडातील सर्वांत मोठी असलेल्या मुंबई बाजार समिती आज (ता.१५) पासून सुरू होत असताना राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची पुणे बाजार समिती कधी सुरू होणार हा प्रश्‍न विचारला जाऊ लागला आहे.  पुण्यात आजपासून भुसार विभाग  सुरू होत असला, तरी फळे-भाजीपाला बाजार सुरू होण्याची शेतकऱ्यांना अधिक प्रतीक्षा आहे.  

पुणे बाजार समिती सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यासाठी पोलीस, महसूल आणि बाजार समिती प्रशासनाने समन्वयाने काम करत असून, फळे भाजीपाल्यासाठी टप्प्याटप्प्याने उपबाजार सुरू करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. मात्र, हे उपबाजार आवार आणि मुख्य बाजार समिती कधी सुरू करणार याबाबत स्पष्ट न करण्यात आल्याने शेतकऱ्यांत तीव्र नाराजी आहे. मुंबईत आजपासून भाजीपाला आणि कांदा-बटाटा विभाग सुरू करण्यात येत आहेत.

कोरोना लॉकडाऊनमध्ये पुणे शहरातील काही हॉटस्पॉट जाहीर करण्यात आले. यामध्ये बाजार समितीचे आवार असलेल्या गुलटेकडी परिसरातील झोपडपट्टीचा समावेश होता. या भागामध्ये दोन जण कोरोना बाधित आढळल्याने, शेतमाल खरेदी विक्रीचा कोणताही पर्याय न देता बाजार समिती बंदचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे शहरातील भाजीपाल्याचा पुरवठा विस्कळीत होऊन कृत्रिम भाववाढ होण्यास सुरुवात झाली होती. तर पोलीस प्रशासन सहकार्य करत नसल्याची तक्रार पूना मर्चंटस चेंबर ने जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे केली होती. 

मर्चंटस् चेंबरच्या तक्रारीची दखल घेत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हाधिकारी, शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासन, बाजार समिती प्रशासनासोबत बैठक समन्वय बैठक घेत मार्ग काढला. यानंतर मर्चंटस् चेंबर ने भुसार विभाग सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेत बुधवार (ता.१५) पासून व्यवहार सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष पोपट ओस्तवाल यांनी जाहीर केले. 

भुसार विभागानंतर फळे भाजीपाला विभाग सुरू करण्याबाबत बाजार समिती प्रशासक बी.जे.देशमुख म्हणाले,‘‘पोलीस, महसूल प्रशासनाच्या समन्वयातून भुसार विभाग सुरू करण्यास मर्चंटस् र्चंटस्‌ चेंबरने सकारात्मक भूमिका घेतली आहे. यानंतर आता फळे भाजीपाला विभाग सुरू करण्यासाठी प्रयत्नशिल असून, त्या अगोदर मांजरी, उत्तमनगर, मोशी आणि खडकी हे उपबाजार सुरू करत आहोत. आज (ता.१५) रात्रीपासून मोशी उपबाजारात आवक सुरू होण्यासाठी मंगळवारी (ता.१४) व्यापारी अडत्यांची बैठक घेतली आहे. नंतर मांजरी येथील बैठक घेऊन गुरुवार (ता.१६) येथील बाजार सुरू होईल.’’

अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले,‘‘ सध्याचा बाजार आवार हा अडते असोसिएशनने नाही तर प्रशासनाने बंद केला होता. आपत्कालीन सेवेत भाजीपाल्याचा समावेश असल्याने शासन निर्णयानुसार आम्ही काम करू.’’

शहरातील मोठ्या मैदानांवर बाजार विचाराधीन 
गुलटेकडी हॉटस्पॉट जाहीर केल्याने मुख्य बाजार सुरू करणे अवघड आहे. मात्र शहरांच्या चारही दिशांना असलेल्या शासनाच्या मोठ्या मैदानांवर चक्राकार पद्धतीने घाऊक खरेदीदारांसाठी व्यवस्था करण्याचे विचाराधीन असल्याचे बाजार समितीचे प्रशासक बी.जे.देशमुख यांनी सांगितले. यामध्ये हडपसर येथील राज्य राखीव पोलीस दलाचे मैदान, शिवाजीनगर आणि चव्हाणनगर येथील पोलीस मुख्यालयाचे मैदान, कृषी महाविद्यालयाचे मैदान या ठिकाणांचा विचार सुरू आहे.

प्रतिक्रिया
सध्या आमच्या शेतात २ एकरवरील कारली सुरू होती. २-४ तोड्यानंतर पुणे बाजार समिती बंद झाल्याने कारली आता झाडावरच लाल होऊन पडू लागली आहे. बाजार समिती सुरू झाली पाहिजे अस वाटत, पण कोरोनामुळे धोका आहेच. एखाद्या हंगामात फड गेला, ते सर्व अंगावर सोसावं लागणार आहे.
- नितीन शेळके, शेतकरी, दौंड, जि.पुणे

 


इतर अॅग्रो विशेष
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
बाजार स्वातंत्र्यांची मागणी पूर्ण पुणेः केंद्र सरकारने सादर केलेल्या शेती आणि पणन...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...