agriculture news in Marathi Mumbai fruit market may start from Monday Maharashtra | Agrowon

मुंबई फळं बाजार सोमवारपासून सुरु होणार? 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 एप्रिल 2020

भाजीपाला, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य बाजारापाठोपाठ मुंबई बाजार समितीत लवकरच फळं बाजारही सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या २० तारखेपासून फळ बाजार सुरु करण्याचे प्रशासन आणि व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत.

मुंबई: भाजीपाला, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य बाजारापाठोपाठ मुंबई बाजार समितीत लवकरच फळं बाजारही सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या २० तारखेपासून फळ बाजार सुरु करण्याचे प्रशासन आणि व्यापाऱ्यांचे प्रयत्न आहेत. याचअनुषंगाने शुक्रवारी संध्याकाळी बाजार समिती प्रशासन आणि फळ व्यापारी तसेच इतर संबंधित घटक यांची संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. 

कोरोनाच्या धास्तीमुळे मधल्याकाळात बाजार समितीतील भाजीपाला, फळं, कांदा-बटाटा आणि अन्न-धान्य तसेच मसाले बाजार बंद ठेवण्यात आले होते. मात्र, मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी हे बाजार पुन्हा सुरु करण्यात आले आहेत. १५ तारखेपासून भाजीपााला आणि कांदा-बटाटा तर १६ तारखेपासून अन्न-धान्य बाजारही सुरु करण्यात आले आहेत. मात्र, फळं बाजार अद्यापही सुरु झालेला नाही. 

राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणावर फळ पिकं तयार आहेत, याचा वेळेत उठाव झाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तसेच ग्राहक आणि शेतकरी हिताचा विचार करुन फळं बाजारही लवकर सुरु व्हावा यासाठी प्रशासनाचा प्रयत्न आहे. सध्या बाजार समितीत गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बाजार येणाऱ्या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण घालण्यात आले आहे. त्याच धर्तीवर फळं बाजारातही अडीचशे वाहनांना परवानगी देण्याची प्रशासनाची भूमिका असल्याचे बाजार समितीचे प्रशासक व सचिव अनिल चव्हाण यांनी दिली आहे. 

रमजानच्या पार्श्‍वभुमीवर हालचाली 
२३ तारखेपासून रमजान महिना सुरु होत आहे. याकाळात फळांना मोठी मागणी असते, त्यामुळे अधिकच्या वाहनांना परवानगी देण्याची मागणी व्यापारी करीत आहेत. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या संकटात सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे. वाहनांची संख्या वाढवल्यास आवारात गर्दी होऊन त्याचा नियोजनावर विपरीत परिणाम होतो, अशी प्रशासनाची भूमिका आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर शुक्रवारी संध्याकाळी बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी व इतर संबंधित घटकांची बैठक बोलावली होती. इतर बाजारांप्रमाणे नियमावली निश्चित करुन येत्या सोमवारपासून (ता.२०) फळं बाजार सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती फळ व्यापारी शिवाजी चव्हाण यांनी दिली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फळं बाजार लवकर सुरु करण्याची मागणी होत आहे. 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...