मुंबई पोलिसांच्या सायबर सेलची फडणवीसांना नोटीस

मुंबई : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उद्या (ता. १३) बीकेसी सायबर पोलिस ठाण्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
Mumbai Police Cyber Cell notices to Fadnavis
Mumbai Police Cyber Cell notices to Fadnavis

मुंबई : पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे. त्यांना उद्या (ता. १३) बीकेसी सायबर पोलिस ठाण्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे. फडणवीस यांनी शनिवारी (ता.१२) निवासस्थानी बैठक घेत महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला. घोटाळ्याची चौकशी न करता घोटाळा बाहेर काढणाऱ्यांची चौकशी सुरू केल्याचे फडणवीस म्हणाले.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप नेते आशिष शेलार या वेळी उपस्थित होते. 

फडणवीस म्हणाले,  ‘‘मुंबई पोलिसांनी मला नोटीस पाठवली आहे. परवा सभागृहात मी सरकारी वकिलाच्या षडयंत्राचा भांडाफोड केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पोलिस अधिकाऱ्यांना त्याचे उत्तर सुचत नसल्याने त्यांनी मला नोटीस बजावली आहे.

मुंबईचा बॉंबस्फोट १२ मार्च रोजी झाला होता. तीन दशकांनंतरही अजून मुंबईकरांच्या जखमा ओल्या आहेत. तरीही त्या बॉम्बस्फोटातील आरोपींशी व्यवहार करणाऱ्यांना सरकार अभय देत आहे.’’ 

‘‘बदली प्रकरणाची सीबीआच चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांचीही चौकशी करत आहे. आपला घोटाळा दाबण्यासाठी कार्यालयीन गुप्त माहिती कशी बाहेर आली? या बाबत सरकारने एक गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मी विरोधी पक्ष नेता आहे. त्यामुळे मी माहिती कुठून मिळविली हा माझा अधिकार आहे आणि त्याला संरक्षणदेखील आहे.

बदली प्रकरणाचा अहवाल सहा महिने सरकारकडे पडून होता. तरीही कारवाई झाली नाही. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर सीबीआयला सर्व माहिती द्यावी लागली. फोन टॅपिंग प्रकरणाशी या प्रकरणाचा काहीही संबंध नाही. मला पोलिस चौकशीला जाणे बंधनकारक नाही, पण मी जाणार आणि चौकशीला सहकार्य करेल,’’ असेही फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com