मराठा आरक्षणासाठी कऱ्हाडमध्ये मुंडण

मराठा आरक्षणासाठी कऱ्हाडमध्ये मुंडण
मराठा आरक्षणासाठी कऱ्हाडमध्ये मुंडण

कऱ्हाड, जि. सातारा ः एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय राहत नाय... या ना अशा अनेक घोषणा देत शहरातून मसूर-कोपर्डे हवेली, उंब्रज व परिसरातील आबालवृद्धांनी मंगळवारी (ता. ७) शहरातून रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. 

दरम्यान सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत काहीच कार्यवाही होत नाही, असा आरोप करत मराठा समाजातील तरुणांनी आज येथील दत्त चौकात मुंडण आंदोलन करून लक्ष वेधले. मराठा आरक्षणासाठी सरकारने आजपर्यंत समाजाला गाजरच दाखवले आहे, असा आरोप करत येथील दत्त चौकातील महिलांच्या ठिय्या आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या वतीने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनधारकांना गाजराचे वाटप करण्यात आले. 

सरकारने आतातरी गाजर दाखवून फसवणूक करू नये, असे म्हणत या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी अचानक आंदोलनाचा पावित्रा घेतल्याने काही काळ धावपळ उडाली. घटनास्थळी प्रांताधिकारी हिंमत खराडे, पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी भेट दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com