agriculture news in marathi, mung procurement status, parbhani, maharashtra | Agrowon

परभणी, हिंगोली जिल्ह्यांत ६१४ क्विंटल मूग खरेदी
टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 नोव्हेंबर 2019

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शुकवारपर्यंत (ता.८) या तीन जिल्ह्यांत सुमारे ३१७० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील येथील केंद्रांवर ६१४ क्विंटल मुगाची खरेदी झाली. परंतु अन्य ठिकाणी अद्याप खरेदी सुरू नाही. पावसात भिजलेला शेतीमाल शासकीय खरेदीच्या निकषांत बसत नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजार हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमी दराने खरेदी केला जात आहे.

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत शासकीय खरेदी केंद्रावर शेतीमाल विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. शुकवारपर्यंत (ता.८) या तीन जिल्ह्यांत सुमारे ३१७० शेतकऱ्यांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील येथील केंद्रांवर ६१४ क्विंटल मुगाची खरेदी झाली. परंतु अन्य ठिकाणी अद्याप खरेदी सुरू नाही. पावसात भिजलेला शेतीमाल शासकीय खरेदीच्या निकषांत बसत नसल्यामुळे व्यापाऱ्यांकडून खुल्या बाजार हमीभावापेक्षा दीड ते दोन हजार रुपये कमी दराने खरेदी केला जात आहे.

किंमत समर्थन मूल्य योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या नांदेड (अर्धापूर), हदगाव, किनवट येथे खरेदी केंद्र मंजूर झाले या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीनसाठी एकूण ३३९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली. परंतु देगलूर, बिलोली येथे खरेदीसाठी संस्था मिळाली नाही. विदर्भ को-मार्केटिंगतर्फे भोकर, धर्माबाद, नायगाव या ठिकाणी खरेदी केंद्रे मंजूर आहेत. यापैकी धर्माबाद येथील केंद्रांवर १४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परभणी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनतर्फे परभणी, जिंतूर, सेलू,पालम,पाथरी, पूर्णा या सहा ठिकाणी केंद्रे मंजूर आहेत. या ठिकाणी सुमारे १२०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

परभणी आणि पूर्णा येथील केंद्रांवर ५१४ क्विंटल मुगाची खरेदी झाली. विदर्भ मार्केटिंग फेडरेशनतर्फे मानवत आणि गंगाखेड येथील खरेदी केंद्रावर १३५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. हिंगोली जिल्ह्यात नाफेडतर्फे हिंगोली, कळमनुरी, वसमत, जवळाबाजार, सेनगाव या पाच केंद्रांवर मिळून सुमारे ८०० शेतकऱ्यांनी  नोंदणी केली आहे. हिंगोली येथील केंद्रांवर ३४ शेतकऱ्यांचा १०० क्विंटल मूग खरेदी करण्यात आला. सोयाबीन काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे मालाची प्रत खराब झाली आहे.ओलाव्याचे प्रमाणदेखील जास्त आहे.त्यामुळे शासकीय खरेदीच्या निकषांस पात्र शेतीमाल नसल्यामुळे शेतक-यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची विक्री करावी लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात गव्हात बियाणे बदलाचे...नगर : रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकांत...
किमान तापमानात घट; विदर्भात थंडीत वाढमहाराष्ट्रावरील हवेचा दाब वाढत आहे. या आठवडाच्या...
परभणीत वाटाण्याला ४००० ते ६००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
पोटदुखीवर नाडुकली उपयुक्त स्थानिक नाव     ः  ...
लोक-जैविपा - भर दुष्काळात उभारलेली...शेतकऱ्यांचा पुढाकार अनुभवल्यावर वन विभागाच्या...
नगर : नुकसान भरपाईसाठी एकशे पस्तीस...नगर : जिल्ह्यात ऑक्टोबर ते नोव्हेंबर या...
'या' बाजार समितीत शेतकऱ्यांना अल्प दरात...अकोला : सध्या कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा...
जळगाव जिल्ह्यात सर्वच नुकसानग्रस्तांना...जळगाव : अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना...
केंद्रीय पथक आज मराठवाड्यात पीक...औरंगाबाद : मराठवाड्यात ऑक्‍टोबर-...
फळबागांची लागवड खोळंबण्यास ‘तो’ ठरला...पुणे : मागील दोन ते तीन महिन्यांत जोरदार पाऊस...
सांगलीत बेदाणा लिलावास प्रारंभसांगली : दिवाळीच्या महिन्याच्या सुटीनंतर बाजार...
अमरावती जिल्ह्याला २४ टक्‍के...अमरावती : मॉन्सूनोत्तर पावसाचा जिल्ह्यात ८० टक्‍...
परभणी विभागात २८ हजार क्विंटल...परभणी : महाबीजच्या परभणी विभागातील सहा...
हमीभावासाठी 'सीसीआय'ला द्या कापूस : ॲड...वर्धा : ‘‘शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीपेक्षा कमी...
राज्यात रताळी ५०० ते ६००० हजार रुपये...जळगावात २२०० ते ३२०० रुपये  जळगाव...
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...