पालघर, नाशिकमध्ये मुसळधार

पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.
Musaldhar in Palghar, Nashik
Musaldhar in Palghar, Nashik

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात व गुजरातमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रातून वाढलेले मॉन्सूनचे प्रवाह यामुळे पोषक हवामान झाल्याने उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे १४० मिलिमीटर, डहाणू १३५, पालघर १२३, वाडा ११८, जव्हार येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातील ठाणे आणि रत्नागिरीतही जोरदार पाऊस पडला. नाशिकमधील घाटमाथ्यावर दमदार हजेरी लावली. नाशिकमधील ओझरखेडा १९९ मिलिमीटर, इगतपुरी १५३, पेठ १४८, हर्सूल येथे ११२ मिलिमीटर नोंद झाली. तर महाबळेश्‍वर येथे १३२ मिलिमीटर पाऊस पडला.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे  पालघर : तलासरी १४०, डहाणू १३५, पालघर १२३, वाडा ११८, जव्हार १०७. नाशिक : ओझरखेडा १९९, इगतपुरी १५३, पेठ १४८, हर्सूल ११२. सातारा : महाबळेश्वर १३२,

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण  पालघर : डहाणू १३५, जव्हार १०७, मोखेडा ९२, पालघर १२३, तलासरी १४०, विक्रमगड ९३, वाडा ११८. रायगड : महाड ४७, माथेरान ७९, पोलादपूर ५७. रत्नागिरी : चिपळूण ४०, दापोली ४९, खेड ६०, लांजा ४६, मंडणगड ४०, राजापूर ४५, रत्नागिरी ४६, संगमेश्‍वर ४० ठाणे : अंबरनाथ ७३, भिवंडी ४६, कल्याण ६७, शहापूर ९२, उल्हासनगर ६५. मध्य महाराष्ट्र : नगर : अकोले ७३. कोल्हापूर : चंदगड ५२, गगनबावडा ९१, राधानगरी ८७. नंदूरबार : नवापूर ७०. नाशिक : हर्सूल ११२, इगतपुरी १५३, ओझरखेडा १९९, पेठ १४८, सुरगाणा ७०, त्र्यंबकेश्‍वर ७४. पुणे : लोणावळा कृषी ६८. सातारा : जावळीमेढा ५२, महाबळेश्‍वर १३२. मराठवाडा  नांदेड : अर्धापूर ५२, कंधार ४५. विदर्भ  भंडारा : लाखणी ५०, मोहाडी ४२, साकोली ५१. गडचिरोली : कुरखेडा ४५. गोंदिया : गोंदिया ६५. नागपूर : मौदा ४२, पारशिवणी ४८, रामटेक ८५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com