Agriculture news in Marathi Musaldhar in Palghar, Nashik | Page 2 ||| Agrowon

पालघर, नाशिकमध्ये मुसळधार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 15 सप्टेंबर 2021

पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

पुणे : पावसाला पोषक हवामान असल्याने राज्यात अनेक हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पालघर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

बंगालच्या उपसागरात व गुजरातमध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रातून वाढलेले मॉन्सूनचे प्रवाह यामुळे पोषक हवामान झाल्याने उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे १४० मिलिमीटर, डहाणू १३५, पालघर १२३, वाडा ११८, जव्हार येथे १०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकणातील ठाणे आणि रत्नागिरीतही जोरदार पाऊस पडला. नाशिकमधील घाटमाथ्यावर दमदार हजेरी लावली. नाशिकमधील ओझरखेडा १९९ मिलिमीटर, इगतपुरी १५३, पेठ १४८, हर्सूल येथे ११२ मिलिमीटर नोंद झाली. तर महाबळेश्‍वर येथे १३२ मिलिमीटर पाऊस पडला.

१०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडलेली ठिकाणे 
पालघर : तलासरी १४०, डहाणू १३५, पालघर १२३, वाडा ११८, जव्हार १०७.
नाशिक : ओझरखेडा १९९, इगतपुरी १५३, पेठ १४८, हर्सूल ११२.
सातारा : महाबळेश्वर १३२,

मंगळवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :
कोकण 
पालघर : डहाणू १३५, जव्हार १०७, मोखेडा ९२, पालघर १२३, तलासरी १४०, विक्रमगड ९३, वाडा ११८.
रायगड : महाड ४७, माथेरान ७९, पोलादपूर ५७.
रत्नागिरी : चिपळूण ४०, दापोली ४९, खेड ६०, लांजा ४६, मंडणगड ४०, राजापूर ४५, रत्नागिरी ४६, संगमेश्‍वर ४०
ठाणे : अंबरनाथ ७३, भिवंडी ४६, कल्याण ६७, शहापूर ९२, उल्हासनगर ६५.
मध्य महाराष्ट्र :
नगर : अकोले ७३.
कोल्हापूर : चंदगड ५२, गगनबावडा ९१, राधानगरी ८७.
नंदूरबार : नवापूर ७०.
नाशिक : हर्सूल ११२, इगतपुरी १५३, ओझरखेडा १९९, पेठ १४८, सुरगाणा ७०, त्र्यंबकेश्‍वर ७४.
पुणे : लोणावळा कृषी ६८.
सातारा : जावळीमेढा ५२, महाबळेश्‍वर १३२.
मराठवाडा 
नांदेड : अर्धापूर ५२, कंधार ४५.
विदर्भ 
भंडारा : लाखणी ५०, मोहाडी ४२, साकोली ५१.
गडचिरोली : कुरखेडा ४५.
गोंदिया : गोंदिया ६५.
नागपूर : मौदा ४२, पारशिवणी ४८, रामटेक ८५.


इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...