मुश्रीफ यांच्या जावयाचा १५०० कोटींचा घोटाळा ः सोमय्या

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास मंत्रालयात त्यांच्या जावयानेच १५०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला.
Mushrif's son-in-law's Rs 1,500 crore scam: Somaiya
Mushrif's son-in-law's Rs 1,500 crore scam: Somaiya

कोल्हापूर : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास मंत्रालयात त्यांच्या जावयानेच १५०० कोटींचा घोटाळा केला आहे, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी मंगळवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला.

मंत्री मुश्रीफ यांचे तीन घोटाळे उघड केले आहेत, लवकरच चौथा घोटाळा उघड करणार आहे. पुढील चौथ्या घोटाळ्यामध्ये मंत्री मुश्रीफ आणि त्यांच्या निकटवर्तीय यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होईल इतके पुरावे माझ्याजवळ असल्याची माहिती त्यांनी दिली. 

राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांचे जीएसटी, टीडीएस, टीसीएस रिटर्न्स भरण्याकरिता निविदा काढली होती जावई जतिन मंगोली यांच्या कंपनीला टेंडर मिळावे यासाठी श्री. मुश्रीफ यांनी लगबग केली. हे टेंडर जयोस्तुते मॅनेजमेंट या कंपनीला दिले आहेत. या कंपनीचा मार्च २०२० ला शून्य उलाढाल आहे. हॉस्टेल चालवणाऱ्या कंपनीचे नाव बदलून हे टेंडर देण्यात आले आहे. टेंडर मिळण्या अगोदर या कंपनीचे नाव यश हॉस्टेल असे होते, ते बदलून जयोस्तुते मॅनेजमेंट प्रा. लि. असे करण्यात आले. तसेच संचालकही बदलण्यात आले असल्याचा आरोप श्री. सोमय्या यांनी केला. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्याबाहेर आल्यावर सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात मानवाधिकारकडे तक्रार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोमय्यांविरोधात शंभर कोटींचा दावा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. हा दावा शंभर कोटींचा आहे. कोल्हापूर दिवाणी न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.आम्हीच पुरविलेले कागद पत्रे घेऊन आमच्यावर खोटेनाटे आरोप केले जात आहेत, असे देखील दाव्यात नमूद करण्यात आले आहे. हा सर्व खटाटोप आम्हाला बदनाम करण्याच्या दृष्टीने सुरू असल्याचे म्हटले आहे. आमचे चारित्र्यहनन थांबवावे, असेही मुश्रीफांनी दाव्यात नमूद केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com