agriculture news in Marathi Mushroom industry got setback of corona Maharashtra | Agrowon

मशरुम उद्योगाचे लाखोचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

कोरोनामुळे सर्वत्र बाजारपेठा, हॉटेल व्यवसाय बंद झालेला आहे. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून केवळ उत्पादन सुरु असून विक्री मात्र ठप्प आहे. या आठवड्यात आता थोडी विक्री सुधारत आहे. तरीही उत्पादनापैकी ५० टक्केही विक्री होत नाही. ही परिस्थिती कधी सुधारेल याबाबत अद्याप काहीही निश्‍चितपणे सांगता येत नाही. 
- आनंद गडे, संचालक, विठ्ठल मशरुम, अकोला 

अकोला ः सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे येथील मशरुम व्यवसायाला लाखोंचा फटका बसला आहे. गेल्या दीड महिन्यापासून हॉटेल, धाबे हा व्यवसाय बंद असून संचारबंदीमुळे इतर प्रतिष्ठानेही उघडल्या गेलेली नाही. त्यामुळे मशरुम विक्री पुर्णतः ठप्प झाली. उत्पादीत होत असलेले मशरुम जनावरांना खाऊ घालण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

विदर्भात अळिंबी (मशरुम) उद्योगाला ओळख तयार करण्याचे काम अकोल्यातील श्‍याम यादव, आनंद गडे आणि रवी तेलंग या तीन मित्रांनी केले. गेल्या १५ वर्षांपासून ते ‘विठ्ठल' नावाचा मशरुम ब्रॅंड यशस्वीपणे चालवित आहेत. हा व्यवसाय कोरोनामुळे पहिल्यांदा ठप्प पडला आहे. दररोज चारशे किलोचे उत्पादन असलेल्या मशरुमपैकी गेल्या दीड महिन्यात बहुतांश माल विक्री होऊ शकला नाही. 

विठ्ठल मशरुम अकोल्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तसेच मुंबई, अहमदाबाद, बडोदा, सुरत, इंदोर, रायपूर, हैदराबाद, भोपाळ, टाटानगर, राहुलकेला (ओरिसा) शहरांमध्ये पाठविले जाते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून मशरुम उत्पादनाला झळ बसणे सुरु झाली. लॉकडाऊनमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प असल्याने तसेच बाजारपेठेत मागणी नसल्याने मोठा पेच तयार झाला. 

मशरुम उत्पादनासाठी तीन महिने कालावधीची एक बॅच राहते. एक महिना कंपोस्ट तयार होण्यास लागतो तर २५ ते २८ दिवस हार्वेस्टींगला लागतात. मार्च, एप्रिल, मे या तीनही महिन्याच्या प्रत्येकी चार बॅचेस लावण्यात आल्या होत्या. त्यापैकी पहिल्या बॅचमधील माल सुरु झालेला होता. मात्र, १८ मार्चपासून जसा बंद सुरु झाला तसतसे हे संकट वाढू लागले. 

मार्च महिन्यात ४ हजार १५० किलो मशरुम विक्री झाले नाही. पाच लाख ३९ हजारांचे नुकसान झाले. तर एप्रिलमध्ये १० हजार २८० किलो मशरुम फेकून द्यावे लागले. १३ लाख ३६ हजारांची झळ सहन करावी लागली. आता मे महिन्यातही नुकसानाचे चक्र सुरु आहे. आतापर्यंत २० लाखांवर नुकसान झाले. सध्या विक्रीची स्थिती सुधारण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे विक्री नसताना खर्चाचेही चक्र फिरते आहे. महिन्याला अडीच लाखांपेक्षा अधिक वीज बील येते. शिवाय मजुरांचे पगार चुकवावे लागत असल्याचे या मशरुमचे संचालक आनंद गडे म्हणाले. 

मशरुम द्यावे लागले फेकून 
लॉकडाऊन सुरु होताच मजुर येणे बंद झाले. त्यामुळे काढणीला आलेले मशरूम जागेवरच काळवंडले. ते काढायलाही मजुर मिळत नव्हते. सुरुवातीला वाळविण्याचा प्रयत्न केला. परंतु उत्पादन अधिक असल्याने ते शक्य झाले नाही. शेवटी उत्पादीत माल काढून जनावरांना खाऊ घालावा लागला, असे आनंद गडे यांनी सांगितले. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...