लातुरात मुस्लिम समाजाच्या जेलभरो आंदोलनाला मोठा प्रतिसाद

लातुरात मुस्लिम समाजाच्या जेलभरो आंदोलनाला मोठा प्रतिसाद
लातुरात मुस्लिम समाजाच्या जेलभरो आंदोलनाला मोठा प्रतिसाद

लातूर : मुस्लिम आरक्षण, शिक्षण व संरक्षण या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) जेल भरो आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दूमदूमून सोडला. या आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक तरुणांनी आरक्षणाचे फलकही हातात घेतले होते. मुस्लिम समाजाला रंगनाथ मिश्र कमीशन, सच्चर कमीशन आणि डॉ. महेमदुर्रहमान कमीशन यांच्या अहवालावर आधारित आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण मिळावे अशी मागणी या समाजाची आहे. मुस्लिम समाजाची अवस्था सर्वच क्षेत्रात मागास आहे. शासन या समाजाला मुख्य प्रवाहात आणत नाही. उच्च न्यायालयाने या समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचे सांगूनही शासनाने आरक्षण दिलेले नाही या बद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.

देशात व राज्यात मुस्लिम समाजातील शिक्षणाचे प्रमाण व स्तर घसरत चालला आहे. या समाजाला देशाच्या राज्याच्या जडन घडण व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. या समाजाला मोफत शिक्षण द्यावे.

मुस्लिम समाजात बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. समाजाला शासकीय, निमशासकीय, राजकीय व विविध क्षेत्रातील नोकऱयात आरक्षण द्यावे, देशात पहेलूखान सारखे अनेक तर राज्यात मोहसीन शेख सारख्या निरापराध व्यक्तीची हत्या करण्यात आल्या, भारतीय मुस्लिम असूनही या समाजाला तिरस्काराच्या नजरेने पाहिले जात आहे, म्हणून हा समाज दहशतीखाली जीवन जगत आहे. या समाजाला सुरक्षा मिळाली पाहिजे या करीता मु्स्लिमांसाठी अॅट्रासिटी कायदा आमलात आणावा आदी मागण्या या समाजाच्या होत्या. या करीता हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील गांधी चौकात हे आंदोलन झाले. या आंदोलनात सहभागी होऊन माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com