agriculture news in marathi, Muslim agitation for reservation in latur gets response | Page 2 ||| Agrowon

लातुरात मुस्लिम समाजाच्या जेलभरो आंदोलनाला मोठा प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

लातूर : मुस्लिम आरक्षण, शिक्षण व संरक्षण या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) जेल भरो आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दूमदूमून सोडला. या आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक तरुणांनी आरक्षणाचे फलकही हातात घेतले होते.

लातूर : मुस्लिम आरक्षण, शिक्षण व संरक्षण या मागणीसाठी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी (ता. 10) जेल भरो आंदोलन करण्यात आले. आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दूमदूमून सोडला. या आंदोलनात तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनेक तरुणांनी आरक्षणाचे फलकही हातात घेतले होते.

मुस्लिम समाजाला रंगनाथ मिश्र कमीशन, सच्चर कमीशन आणि डॉ. महेमदुर्रहमान कमीशन यांच्या अहवालावर आधारित आरक्षण, शिक्षण आणि संरक्षण मिळावे अशी मागणी या समाजाची आहे. मुस्लिम समाजाची अवस्था सर्वच क्षेत्रात मागास आहे. शासन या समाजाला मुख्य प्रवाहात आणत नाही. उच्च न्यायालयाने या समाजाला शैक्षणिक आरक्षण देण्याचे सांगूनही शासनाने आरक्षण दिलेले नाही या बद्दल शासनाचा निषेध करण्यात आला.

देशात व राज्यात मुस्लिम समाजातील शिक्षणाचे प्रमाण व स्तर घसरत चालला आहे. या समाजाला देशाच्या राज्याच्या जडन घडण व मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. या समाजाला मोफत शिक्षण द्यावे.

मुस्लिम समाजात बेरोजगाराचे प्रमाण वाढले आहे. समाजाला शासकीय, निमशासकीय, राजकीय व विविध क्षेत्रातील नोकऱयात आरक्षण द्यावे, देशात पहेलूखान सारखे अनेक तर राज्यात मोहसीन शेख सारख्या निरापराध व्यक्तीची हत्या करण्यात आल्या, भारतीय मुस्लिम असूनही या समाजाला तिरस्काराच्या नजरेने पाहिले जात आहे, म्हणून हा समाज दहशतीखाली जीवन जगत आहे. या समाजाला सुरक्षा मिळाली पाहिजे या करीता मु्स्लिमांसाठी अॅट्रासिटी कायदा आमलात आणावा आदी मागण्या या समाजाच्या होत्या. या करीता हे जेलभरो आंदोलन करण्यात आले. येथील गांधी चौकात हे आंदोलन झाले. या आंदोलनात सहभागी होऊन माजी राज्यमंत्री अमित देशमुख यांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात समाजातील तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर सोडून दिले. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात नुकसानीचे ५४ हजार हेक्...सांगली : ‘‘जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
हवामाना आधारित फळपीकविम्याच्या निर्णयात...नाशिक  : जिल्ह्यात द्राक्ष, डाळिंब ही फळपिके...
`क्यार` चक्रीवादळाचा सिंधुदुर्गातील ६८...सिंधुदुर्ग  ः ‘क्यार’ चक्रीवादळाने...
नाशिक जिल्ह्यात सततच्या पावसामुळे...नाशिक  : गेल्या पंधरा दिवसांपासून कसमादे...
तडे गेलेल्या द्राक्षांची खरेदी;...नाशिक : कसमादे पट्ट्यातील पूर्वहंगामी द्राक्ष...
साताऱ्यातील छावणीचालक अनुदानाच्या...दहिवडी, जि. सातारा  : जुलै महिन्यापासून चारा...
वीज नियामक मंडळाचे नवीन धोरण सौरऊर्जा...पुणे  ः राज्यातील राजकीय अस्थिरतेचा फायदा...
पर्यायी सरकारसाठी काँग्रेस आघाडीत खलबतेमुंबई : अडीच वर्षाचे मुख्यमंत्रिपद आणि समान...
पुणे जिल्ह्यात धुक्याचे साम्राज्य  पुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाने उघडीप...
नगरमधील आठ साखर कारखान्यांच्या... नगर : विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण...
सांगली : डाळिंब नुकसानीचा विमा किंवा...आटपाडी, जि. सांगली ः अतिपावसामुळे नुकसान झालेल्या...
तंत्र कांदा बीजोत्पादनाचे...बीजोत्पादनासाठी निवडलेले कांदे गोल, मध्यम किंवा...
औरंगाबादेत फ्लॉवर १४०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
द्राक्षबाग वाचविण्यासाठी मणिमंगळसूत्र...विटा, सांगली ः खानापूर तालुक्यात मॉन्सूनोत्तर...
नियंत्रण करडईवरील रोग, किडीचे...सतत पडणारा पाऊस, ढगाळ हवामान आणि हवेतील वाढलेले...
कृषी सल्ला (राहुरी विभाग)हवामान अंदाज ः पुढील पाच दिवस आकाश ढगाळ राहील....
सांगलीतील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतसांगली : ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यात कृष्णा...
कोल्हापूर जिल्ह्यात वाफशाअभावी रब्बी...कोल्हापूर : गेल्या दोन महिन्यांपासून...
गडचिरोली जिल्ह्यात खरिपात केवळ ६० टक्‍...गडचिरोली  ः आदिवासी आणि नक्षलप्रवण असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात पंचनाम्याचे ८५ टक्के...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात ऑक्‍टोबर महिन्यात...