कोल्हापुरात ओला वाटाणा ५०० ते ६०० रुपये

ओला वाटाणा
ओला वाटाणा

कोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या सप्ताहात ओला वाटाणा, भेंडीच्या दरात वाढ कायम होती. ओला वाटाण्यास दहा किलोस ५०० ते ६००, तर भेंडीचे दर १०० ते २७० रुपये इतके होते. गवारीची पन्नास ते शंभर पोती आवक होती. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपयांपर्यंत दर होता. कारल्याच्या आवकेत काहीशी वाढ झाली. कारल्यास दहा किलोस  ४० ते २५० रुपये दर मिळाला. कारल्याचे दर गेल्या सप्ताहाच्या तुलनेत स्थिर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.  दोडक्‍याची दोनशे ते तीनशे करंड्या आवक झाली. दोडक्‍यास दहा किलोस  ५० ते २२० रुपये दर मिळाला. काकडीच्या आवकेत या सप्ताहातही वाढ होती. काकडीची दररोज दोनशे ते तीनशे करंड्या आवक होती. दहा किलोस २० ते २५० रुपये दर मिळाला. गाजराची दीडशे पोत्यांची आवक होती. गाजरास दहा किलोस ५० ते १७० रुपये दर होता. फ्लॉवरची दररोज सहाशे ते सातशे पोती आवक झाली. फ्लॉवरला दहा किलोस  ५० ते २५० रुपये दर होता. कोथिंबिरीची दररोज शेकडा १९ ते २० हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ३०० ते ८०० रुपये दर मिळाला. मेथीची पाच ते सहा हजार पेंड्या आवक होती. मेथीस शेकडा ५०० ते १००० रुपये इतका दर मिळाला.  आंब्याची आवक धीम्या गतीने  यंदा कोकणातून हापूसची आवक अत्यंत धीम्या प्रमाणात होत आहे. चार डझनाच्या हापूस आंब्याचा दर १००० ते ३००० रुपये इतका आहे. तीनशे ते चारशे पेट्या हापूस बाजार समितीत दररोज दाखल होत आहे, परंतु सध्या कोकणात ढगाळ हवामान असल्याने याची चिंता उत्पादकांना लागली आहे. यामुळे एप्रिलमध्ये नेमकी आंब्याची आवक किती वाढेल, याबाबत सध्या काहीच सांगता येत नसल्याचे फळबाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com