agriculture news in marathi, n Nashik district, the number of tankers are on one hundred and half in monsoon | Agrowon

नाशिक जिल्ह्यात टँकरचा आकडा पावसाळ्यात दीडशेवर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 3 ऑगस्ट 2019

नाशिक : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दमदार पावसाचे आगमन झाले. तर काही भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तरी जिल्हाभर म्हणावा तसा समाधानकारक पाऊस न झाल्याने अजूनही पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी अजूनही जिल्ह्याची मदार टॅंकरवरच आहे. 

नाशिक : जुलै महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात दमदार पावसाचे आगमन झाले. तर काही भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. तरी जिल्हाभर म्हणावा तसा समाधानकारक पाऊस न झाल्याने अजूनही पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी अजूनही जिल्ह्याची मदार टॅंकरवरच आहे. 

मागील महिन्यात २५ जूनअखेर सर्वाधिक १२७८ गावे, वाड्यांसाठी ३९७ टँकर सुरू होते. मात्र त्यात घट होऊन जुलै महिनाअखेर ४५७ गावे-वाड्यांची तहान टँकरवरच अवलंबून आहे. त्यामुळे जिल्हाभर १५५ टँकर सुरू आहेत. यासाठी अजूनही १५९ विहिरी अधिग्रहित आहेत. टँकरच्या ३७६ फेऱ्या सुरू आहेत. येवला तालुक्यात सर्वाधिक ४१ टँकर अजूनही सुरू आहेत. मात्र मागील महिन्याच्या तुलनेत ही गावे व टँकरची आकडेवारी ५० टक्के कमी झाली आहे. 

पावसाचे उशिरा आगमन झाल्याने अडचणी वाढल्या होत्या. मात्र नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, कळवण आणि सुरगाणा तालुक्यांना या पावसाने झोडपून काढले आहे. येवला, नांदगाव, मालेगाव, बागलाण, सिन्नर, चांदवड, मालेगाव आदी तालुक्यांमध्ये पावसाने समाधानकारक हजेरी लावली नाही. परिणामी, तालुक्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
नांदेडमध्ये हळद ४९०० ते ५७०० रूपये...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...