नाफेडचा कांदा होतोय खराब...

नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांंंसह नाफेडचा जवळपास ३० टक्के कांदा सडला आहे. मार्च-एप्रिलमध्ये साठवलेला हा कांदा आहे. नाफेड फक्त एक एजन्सी म्हणून काम करते. केंद्र सरकारकडे हा कांदा पूर्ण अधिकारात आहे. कांदा केव्हा विकायचा आणि खरेदी करायचा हा निर्णय सर्वस्वी केंद्र सरकारचा अधिकार आहे. - नानासाहेब पाटील, संचालक, ‘नाफेड’
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक: बदलत्या वातावरणामुळे आर्द्रता वाढल्याने कांदा सडण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘नाफेड’ने दर स्थिरीकरण योजनेतून खरेदी केलाला कांदाही खराब होत आहे. ‘नाफेड’चा २० टक्के म्हणजेच १२५ कोटी रुपयांचा कांदा सडल्याचा प्राथमिक अंदाज ‘नाफेड’चे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी व्यक्त केला. परिणामी, `नाफेड`कडून बाजारात कमी कांदा येणार, अशी शक्यता वर्तविली जात आहे.  घाऊक बाजारात कांद्याचे दर घसरत असताना नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमधून ‘नाफेड’ने ८०० ते १४०० रुपये प्रतिक्विंटल दराने तब्बल ५६ हजार टन कांदा खरेदी केला होता. एप्रिल ते जून या काळात खरेदी करण्यात आलेला हा कांदा आता सडू लागलेला आहे. उपलब्ध कांद्याच्या तुलनेत १५ हजार टन कांदा खराब झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या कांद्याचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असताना दररोज ४०० टन कांदा ३०० कर्मचाऱ्यांमार्फत निवडून पाठविण्यात येत आहे. प्रामुख्याने दिल्ली, कलकत्ता शहरांसह हा कांदा देशातील २० शहरांमध्ये सध्या पाठविण्यात येत आहे. त्यामुळे कांदा बाहेर काढणे, त्याची हाताळणी व प्रतवारी करताना अधिक काळ लागत आहे. त्यामुळे कांदा साठविण्याची प्रक्रिया कांदा आता खराब होत असल्याने अडचणीत आहे.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल यासाठी मार्च आणि एप्रिलमध्ये कांदा चाळीमध्ये साठवून ठेवलेला होता. मात्र चाळीमध्ये साठवलेला कांद्याला पाच महिने उलटून गेल्यामुळे कांद्याची प्रत खराब झाली आहे. सहा महिन्यापूर्वी खरेदी झालेला कांदा असल्याने त्यामध्ये दररोज होणाऱ्या वातावरणाच्या बदलामुळे कांद्यामध्ये घट आणि नुकसान ही २५ ते ३० टक्के दिसत असल्याने शेतकऱ्यांबरोबर नाफेडच्या साठवलेल्या कांद्याचे नुकसान झाले आहे.  सध्या देशांतर्गत शहरी भागात ५० ते ६० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी केंद्राने खरेदी केलेला हा कांदा बाजारात आणून कांदा दर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र उपलब्ध कांद्याच्या तुलनेत सरकारचा मोठा कस लागणार हे नक्की आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com