‘नाफेड’च्या कांद्यावर परप्रांतीय चोरट्यांचा डल्ला; केली परस्पर विक्री

‘नाफेड’च्या कांद्यावर परप्रांतीय चोरट्यांचा डल्ला; केली परस्पर विक्री
‘नाफेड’च्या कांद्यावर परप्रांतीय चोरट्यांचा डल्ला; केली परस्पर विक्री

नाशिक : जिल्ह्यात कांदा रोपांच्या चोरीच्या घटना सुरू असतानाच परप्रांतीय चोरट्यांनी चक्क ‘नाफेड’च्या सरकारी कांद्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘नाफेड’ने खरेदी केलेला कांदा सरकारी वाहनांतून दिल्लीकडे जात असताना ५०० गोणी, १२ लाख ५० हजार रुपये किमतीच्या कांद्याची परस्पर विक्री केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जायखेडा पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना अटक केली असून अन्य दोन संशयितांचा पोलिस शोध घेत आहेत.     याबाबत सविस्तर माहिती अशी, की संशयित आरोपी तसलीम शेर मोहम्मद (वय २१), (रा. मेहुली ता. जि. नुह, हरियाना) व त्याच्या साथीदारांनी कांदा चोरीचा कट रचून इमरान शेर मोहम्मद (वय ३३) (रा. मेहुली ता. जि. नुह, हरियाना) याच्या मालकीच्या ट्रकचे (क्र. आरजे १४, जीएच ९९०८) कागदपत्रे व नंबर प्लेट दुसऱ्या (क्र. आरजे १४ जीके ८७९०) ट्रकला लावून सदर नंबरचे खोटे कागदपत्रे देवून कंपनीचा विश्वास संपादन केला. ट्रकमध्ये नाफेडचा पाचशे गोणी, २४३२५ किलो वजनाचा, १२ लाख ५० हजार रुपये किमतीचा कांदा भरून दिल्ली येथे रवाना करण्यात आला होता. इमरान शेर मोहंमद याने वाहतुकीदरम्यान संतोषसिंग बन्शीसिंग यांच्याकडून बॅंक खात्यावर पंधरा हजार मागून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे.  तसलीम शेर मोहंमद याने साथीदारांसह कांदा दिल्ली येथे पोच न करता ट्रक क्र.आरजे ०२, जीबी ६२८ मध्ये २४० गोण्या भरून त्याच्या साथीदारांनी काशिम उर्फ चुन्ना इम्राखान (वय ३३, रा.धौजपाल मोहल्ला गांव धौज फरीदाबाद) व केविद्र देशराजसिंग (रा.पाली चौधरी चौपाट ता.जि.फरीदाबाद) यांना त्याची विक्री केली. संशयितांनी फसवणूक करून विक्रीसाठी कांदा आणला आहे हे माहिती असतानाही या दोघांनी कांदा खरेदी केला व त्याची विल्हेवाट लावली.  हा घडलेला सर्व प्रकार सी. जे. दारसल लॉगिस्टिक कंपनीचे शाखा व्यवस्थापक संतोषसिंग बन्शीसिंग यांच्या फिर्यादीवरून जायखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चार परप्रांतीय संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन संशयित फरार झाले आहेत. फरार झालेले इम्रान सिद्धिकी (रा. खोयरी राजस्थान), तौफीक शेर मोहंमद (रा. मालुका, ता.जि.,नुह राज्य हरियाना) आरोपीसह ट्रक क्र. आरजे १४, जीएच ९९०८ शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवरंजन पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जी.डी.पाटील करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com