Agriculture news in Marathi At Nagalwadi, vegetable fodder was harvested | Agrowon

नागलवाडी येथे भाजीपाला झाला जनावरांचे वैरण

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 एप्रिल 2020

लाखो रुपये उत्पादन खर्च करून गिलके तसेच कष्टाने शेडनेटमध्ये सिमला मिरची लावली आहे. उत्पादन सुरू झाले असून शेतमजूर मिळत नसतांनाही शेतातील गिलके, सिमला मिरची खुडावीच लागतात, मात्र हातात दमडीही पडत नसल्याने येत्या काळात आर्थिक चणचण भासणार आहे. अश्यातच शेतीसाठी मातीत ओतलेला पैसा फेडायचा कसा हा मोठा प्रश्न पडला आहे. 
- सागर वसंत भोर, युवा शेतकरी, नागलवाडी, ता.नाशिक 

गिरणारे, नाशिक : साडेचार एकर शेतातील काढणीस आलेले गिलके बाजारात मातीमोल विकण्यापेक्षा थेट जनावरांना वैरण म्हणून खाऊ घातल्याची घटना नागलवाडी (ता.नाशिक) येथे घडली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतातील उभा शेतमाल मातीमोल विकण्यापेक्षा तो जनावरांना वौरण म्हणून घालत आहेत. तसेच तरुण शेतकरी सागर वसंत भोर आणि त्याचा भाऊ राहुल वसंत भोर यांनी शेतात खुडलेले गिलके गावात स्वतःहून वाटून टाकले. 

जिल्ह्याच्या पश्चिमपट्ट्यात बागायती क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने द्राक्ष, भाजीपाला मोठ्या प्रमाणात असतो. यंदाही हवामान अनुकूल आणि भरपूर पाणी असल्याने उन्हाळी बागायती पिके जोमात आहेत. मात्र, द्राक्षशेतीबरोबर भाजीपाला विकायचा कुठं? गिर्हाईक नाही, व्यापारी माल घेत नाही, परप्रांतातील व्यापारी निघून गेले.

बाजार समितीत मातीमोल बाजारभाव असल्याने भाजीपाला विकायचा कसा? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. या परिस्थितीत सागर आणि राहुल या भावंडांनी शेतातील गिलके, लाखो रुपये खर्च करून उभारलेल्या शेडनेटमधील
सिमला मिरचीचे खुडलेले पीक क्रेटमध्ये भरून थेट गावात मोफत दिले.

रोज ४५ क्रेट गिलके जनावरांना घालन्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कोरोनाच्या संकटात सामान्य लोकांची उपासमार होत असताना, लॉकडाऊन मूळे शेतातील कामास शेतमजूर मिळत नाही, भाजीपाला मातीमोल विकला जात आहे, शेतमालाची मागणीही रोडावली आहे, त्यात बाजारभाव
कवडीमोल असल्याने शेतकरी चिंतेत सापडला असल्याचे दिसून येत आहे. 

 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...