नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल

नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये
नगरला वांगे १००० ते ३५०० रुपये

नगर ः नगर बाजार समितीत मंगळवारी (ता. ७) १५ क्विंटल वांगीची आवक झाली. प्रतिक्विंटलला १००० ते ३५०० रुपये व सरासरी २२५० रुपये प्रतिक्विंटलला दर मिळाला. बाजार समितीत सरासरी १५ ते २५ क्विंटल वांगीची दर दिवसाला आवक होत असते. बाजार समितीत २ ऑगस्टला १८ क्विटंलची आवक होऊन २००० ते ४००० रुपये व सरासरी ३००० हजार रुपये दर मिळाला.

२६ जुलैला १७ क्विंटलची आवक होऊन १००० ते ३५०० रुपये व सरासरी २२५० रुपये दर मिळाला. १९ जुलैला २० क्विंटलची आवक होऊन १००० ते ३००० व सरासरी २००० रुपये दर मिळाला. तर १२ जुलैला १७ क्‍विंटलची आवक होऊन १०० ० ते २५०० रुपये व सरासरी १५५० रुपये दर मिळाला. ५ जुलैला १७ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० रुपये व सरासरी १७५० रुपये दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com