शेतकऱ्यांच्या संतापानंतर नगर जिल्हा बॅंकेकडून सावरासावर

जिल्हाभरातील शेतकरी संकटात असतानाही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून पीककर्ज, तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचे शुक्रवारी (ता. २७) आदेश देण्यात आले होते.
nagar district bank
nagar district bank

नगर: जिल्हाभरातील शेतकरी संकटात असतानाही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून पीककर्ज, तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीचे शुक्रवारी (ता. २७) आदेश देण्यात आले होते. मात्र या आदेशानंतर जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यामुळे शनिवारी (ता.२८) जिल्हा बॅंकेला सावरासावर करण्याची नामुष्की आली. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने परतफेडीसाठी तीन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे जिल्हा बॅंकेही ३१ मार्चअखेर वसुलीस पात्र असलेल्या सर्व कर्जांच्या परतफेडीची मुदत ३० जूनपर्यंत करण्यात असल्याचे सांगितले. 

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने कर्जवाटप केलेल्या पीककर्ज, तसेच मध्यम मुदत व दीर्घ मुदत कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली ३१ मार्चच्या आत करावी, असे आदेश काढले होते. शेतकऱ्यांच्या हितासाठीच हा निर्णय घेतला असून संचालक मंडळाच्या बैठकीत तसे ठरले असल्याचे आदेशात नमुद केले होते. आदेशानंतर जिल्हाभरात शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला. संभाजी बिग्रेडचे जिल्हाध्यक्ष टीळक भोस यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने खरीप हंगाम २०१९-२०चे कर्ज वसूल करण्याचे पत्रक काढल्याचे निदर्शनास आणून देत बॅंकेची कर्जवसुली तत्काळ थांबवण्याबाबत राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांना निवेदन दिले होते. 

शेतकऱ्यांच्या संतापानंतर बॅंकेला सावरासावर करावी लागली. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये आर्थिक व्यवहार सुरू ठेवण्यात अडचणी येत असल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी (ता. २७) जारी केलेल्या परिपत्रकानुसार अल्पमुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत आदी कर्जांच्या वसुलीस पात्र (परतफेड) ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. जिल्हा बॅंकेने खरीप पिकांसाठी सुमारे ७११ कोटींचे, तर रब्बी पिकांसाठी सुमारे ८२ कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचे बॅंकेचे अध्यक्ष सिताराम गायकर यांना सांगावे लागले. अगोदरच कर्मचारी भरती प्रकरणात जिल्हा बॅंकेची विश्वासाहर्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. त्यातच शेतकरी अडचणीत असताना वसुलीचे आदेश दिल्याने चांगला संताप व्यक्त केला गेला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com