Agriculture news in Marathi Nagar District Bank will provide interest free peak loan up to Rs 3 lakh | Agrowon

नगर जिल्हा बॅंक देणार तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज

टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 जुलै 2020

नगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेतल्यास दोन टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्याज परताव्यामुळे हे व्याज लागत होते. दोन टक्के भरावयाचे व्याज जिल्हा बॅंक स्वनिधीतून भरणार आहे, असा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

नगर : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाने बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी तीन लाखांपर्यंत पीककर्ज घेतल्यास दोन टक्के व्याज भरावे लागत होते. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या व्याज परताव्यामुळे हे व्याज लागत होते. दोन टक्के भरावयाचे व्याज जिल्हा बॅंक स्वनिधीतून भरणार आहे, असा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाची दोन दिवसांपूर्वी अध्यक्ष सीताराम गायकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. उपाध्यक्ष रामदास वाघ, ज्येष्ठ संचालक शिवाजी कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे आदी उपस्थित होते.

नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने मागील महिन्यात झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना वैयक्तिक हमीपत्रावर पीककर्ज देण्याचा आगळावेगळा निर्णय घेतला होता. शिवाय पीककर्जाच्या क्षमतेतही वाढ केली आहे. यंदा शेतकऱ्यांकडून पीककर्जाची बॅंकेकडे वारंवार मागणी होत आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे बॅंक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करू शकत नव्हती.

यंदा हवामान खात्याने दमदार पावसाचे भाकीत केले आहे. त्यामुळे कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेने घेतला आहे. संयुक्त उतारा असलेले शेतकरी सभासद, पीककर्ज सोडून मध्यम व दीर्घ मुदतीचे इतर बॅंकांकडून कर्ज घेणारे कर्जदार शेतकरी सभासद, कर्जमुक्ती योजनेत पात्र असलेल्या मात्र शासनाकडून कर्जमाफीची रक्कम प्राप्त न झालेल्या शेतकरी सभासदांसाठी पीककर्ज पुरवठा करण्याचा निर्णय यापूर्वीच जिल्हा बॅंकेने घेतलेला आहे.

शेतकऱ्यांकडून पीककर्जाची बॅंकेकडे वारंवार मागणी होत आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे बॅंक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करू शकत नव्हती. यंदा कोरोना संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे कर्जपुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेने घेतला आहे.
- सीताराम गायकर, अध्यक्ष,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, नगर

 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...