Agriculture news in Marathi Nagar district in Election fade will be held in the New Year | Page 2 ||| Agrowon

नगरमध्ये नव्या वर्षातही रंगणार निवडणुकांचा फड

टीम अॅग्रोवन
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

नगर ः लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हे वर्ष गेले. आता नवे वर्षही नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाणार आहे. जिल्ह्यात आगामी वर्षात जिल्हा सहकारी बॅंक, ७६५ ग्रामपंचायती, आठ सहकारी साखर कारखाने, दहा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांना ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान असते. २०२० या वर्षातही निवडणुकांच्या वातावरणामध्ये राजकारणाच्याच चर्चांना उधाण येणार आहे. 

नगर ः लोकसभा, विधानसभा निवडणुकांत हे वर्ष गेले. आता नवे वर्षही नगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाणार आहे. जिल्ह्यात आगामी वर्षात जिल्हा सहकारी बॅंक, ७६५ ग्रामपंचायती, आठ सहकारी साखर कारखाने, दहा बाजार समित्यांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे. होऊ घातलेल्या निवडणुकांना ग्रामीण भागात महत्त्वाचे स्थान असते. २०२० या वर्षातही निवडणुकांच्या वातावरणामध्ये राजकारणाच्याच चर्चांना उधाण येणार आहे. 

ग्रामीण भागातील शेतशिवारासाठी, आर्थिक प्रगतीसाठी मागील सहा दशकांच्या कारकिर्दीत जिल्हा सहकारी बॅंकेने दिलेले योगदान पथदर्शी आहे. विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बॅंक ग्रामीण भागातील प्रत्येक घराशी जोडलेली आहे. बॅंकेच्या संचालक मंडळाची मागील पंचवार्षिक निवडणूक मे २०१५ मध्ये झाली होती. आता एप्रिल २०२० मध्येच बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. 

विधानसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता पुढील वर्षात नगर जिल्ह्यातील आठ कारखान्यांची संचालक मंडळे निवडण्यासाठी निवडणूक होणार आहे. नगर जिल्हा सहकारी साखर कारखान्यांचा जिल्हा मानला जातो. सहकारातील निवडणुका रंगतदार असल्याने चर्चेत असतात. जिल्ह्यात १४ बाजार समित्यांपैकी १० बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची उलाढाल मुख्यत्वे कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे केली जाते. 

विश्‍वसनीय पद्धतीने शेतकऱ्यांचा शेतमाल विकला जाऊन त्यांच्या घामाचे दाम योग्य रितीने मिळावे, यासाठी कृषी उत्पन्न समित्या अस्तित्वात आल्या. या समित्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य, हमाल-मापाडी व सेवा संस्थांतील चार मतदारसंघांसाठी मतदान होते. त्यातील मतदारांची संख्या मोजकी असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली, अर्थात जिल्हा निवडणूक शाखेमार्फत या निवडणुका पार पडतील.

मतदारयादीत आता नव्याने शेतकऱ्यांचाही समावेश असणार आहे. जिल्ह्यात १६०२ गावे आहेत. नव्याने चार ग्रामपंचायती अस्तित्वात आल्याने, ग्रामपंचायतींची संख्या १३१६ पर्यंत वाढली आहे. पुढील वर्षी मुदत संपणाऱ्या ७६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. ‘नवे गडी नवे राज्य’ स्थापन करण्यासाठी गावकारभारी लवकरच कामाला लागणार आहेत. टप्प्याटप्प्याने या निवडणुका पार पडणार आहेत. जिल्हा सहकारी बॅंक संचालक मंडळाची मुदत संपण्याचा कालावधी ५ मे २०२० आहे. त्यानंतर बॅंकेचीही निवडणूक होणार आहे. 

नेत्यांचाही लागणार कस 
नगर जिल्ह्यामध्ये जामखेड, कर्जत, संगमनेर, राहाता, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे, शेवगाव, पाथर्डी, कोपरगाव या दहा बाजार समित्यांच्या निवडणुका नव्या वर्षात होत आहेत. तालुका आणि जिल्हा पातळीवर राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांना बाजार समितीच्या राजकारणात मोठा रस असतो. राज्यात पक्षीय राजकारणातून सत्ता बदल झाला. त्याचा परिणाम आता थेट बाजार समितीच्या निवडणुकीवर होणार असल्याचे सांगितले जात आहे. ग्रामपंचायतीच्या राजकारणापासून वरच्या पातळीवरील राजकारणाला महत्त्व आहे. ग्रामपंचायतीवर सत्ता येण्यासाठी थेट नेत्यांचा सहभाग असतो. त्यामुळे आता सर्वपक्षीय नेत्यांचा बाजार समिती, ग्रामपंचायतींच्या निवडणुकात कस लागणार आहे.


इतर ताज्या घडामोडी
बारामतीत हमीभाव हरभरा खरेदी केंद्र सुरूपुणे ः शेतकऱ्यांच्या उत्पादित हरभऱ्यांला हमीभाव...
सेंद्रिय शेतीचे शेतकरी गटांना शेतातच...पुणे ः कृषी विभाग, आत्मा आणि बारामती कृषी विज्ञान...
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दक्षता घ्या ः...वाशीम ः कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा...
उजनी धरणातील पाणी पातळी उणे ११...सोलापूर ः सोलापूरची वरदायिनी असलेल्या उजनी...
लातूरमध्ये १ लाख १४ हजार क्विंटलवर...लातूर : जिल्ह्यातील ३४ हजार ९४८ हरभरा उत्पादकांनी...
मका खरेदीसाठी संदेश पाठवूनही खरेदी...औरंगाबाद : जिल्ह्यात सुरू झालेल्या ८ हमी...
उच्चदाब वीजग्राहकांना दीडपट ते दहापट...इचलकरंजी, जि. कोल्हापूर : महाराष्ट्र विद्युत...
अकोल्यात कोरोनाचा कहर कायम विदर्भात...अकोला ः जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग...
निर्यातदारांनी निर्यातीच्या द्राक्षांचे...नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम सुरू...
नांदेडमध्ये ८६२ शेतकरी गटांतर्फे थेट...नांदेड : जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८६२ शेतकरी...
परभणीत दोन महिन्यात १३०० टन फळे,...परभणी : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा...
नाशिक : अफवेमुळे दरावर परिणाम; टोमॅटो...नाशिक  : कसमादे पट्ट्यातील अनेक शेतकऱ्यांनी...
लातूरमध्ये टाळेबंदीत शेतकऱ्यांच्या...लातूरः टाळेबंदीच्या काळात लातूर बाजार समितीचा अडत...
अन्य जिल्ह्यातून परभणीत येण्यास कृषी...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
बहुभक्षीय उपद्रवी कीड ः वाळवंटी टोळवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही कीड मोठ्या प्रमाणात...
उन्हाळ्यातील केळी बागेचे व्यवस्थापनउष्णलाटांमुळे बागेतील तापमान वाढते, आर्द्रता कमी...
नियोजन संत्रा बाग लागवडीचे..हलक्‍या जमिनीत निचरा चांगला होतो. मात्र या...
प्रत्येकी १० गुंठ्यात पिकवा विविध...भविष्यात किंवा येत्या खरीपापासून त्यासाठी...
समजाऊन घ्या ग्रामपंचायतीचा अर्थसंकल्प ‘आमचं गाव-आमचा विकास' या लेखमालेमध्ये आपण शाश्वत...
असे करा द्राक्षबागेतील स्ट्रोमॅशिअम...खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मान्सूनपूर्व,...