Agriculture news in marathi In the Nagar district Onion prices volatile | Agrowon

नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिर

टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 एप्रिल 2021

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कांदा दर सतत अस्थिर आहेत. बाजारात आवक वाढलेली असून, दर मात्र कमी होत आहेत. बाजारात सध्या २५० ते १००० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळत आहे.

पुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात कांदा दर सतत अस्थिर आहेत. बाजारात आवक वाढलेली असून, दर मात्र कमी होत आहेत. बाजारात सध्या २५० ते १००० रुपये प्रती क्विंटलचा दर मिळत आहे. लॉकडाउन होणार असल्याच्या शक्‍यतेचाही कांदा बाजारावर परिणाम होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या लिलावात नगर बाजार समितीत तब्बल ५७ हजार ३७८ कांदा गोण्याची आवक झाली होती. 

 कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने काही दिवसापासून मिनी लॉकडाउन झाले आहे. दोन दिवस कडकडीत बंद आहे. शिवाय यापुढेही काही दिवस कडक लॉकडाउन होण्याची शक्यता दिसत आहे. बाजार समित्यांत कांद्याचे लिलाव सुरू आहेत. मात्र पुढील काळात किती दिवस लॉकडाउन असेल. 

 कांदा बाजार सुरू राहतील की नाही या शंकेने दोन दिवसांपूर्वी कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झाली. त्यामुळे दोन दिवसांच्या अंतराने होत असलेल्या कांदा लिलावात सातत्याने दरात चढ-उतार होत आहे. हॉटेल्स, खाद्य पदार्थाचे स्टॉल बंद ठेवण्यात आलेले आहेत. त्याचा परिणाम कांद्याला मागणी घटली असून, भावात घट झालेली आहे. महाराष्ट्रासह शेजारील इतर राज्यातही कांद्याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याची मागणी थंडावली आहे. लॉकडाउनची शेतकऱ्यांनीही धास्ती घेतली असल्याचे दिसत आहे.

दोन दिवसांपूर्वीचे दर (क्विंटल)    

  • एक नंबर    ७५० ते १००० 
  • दोन नंबर    ६५० ते ५५० 
  • तीन नंबर    ४०० ते ६५० 
  • चार नंबर    २५० ते ४००

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...