तीनशे गावे, दीड हजार वाड्या-वस्त्या दुष्काळाने प्रभावित

तीनशे गावे, दीड हजार वाड्या-वस्त्या दुष्काळाने प्रभावित
तीनशे गावे, दीड हजार वाड्या-वस्त्या दुष्काळाने प्रभावित

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये आता दुष्काळीची तीव्रता वाढू लागली आहे. जिल्ह्यामधील तीनशे सहा गावे आणि दीड हजार वाड्या वस्त्यांवरील सहा लाख ७३ हजार ५३० लोक दुष्काळाच्या झळा सोसत असून, या गावांना ३७१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. महिनाभरात टॅंकरचा आकडा पाचशेच्या जवळपास जाण्याची शक्‍यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर होत असून छावण्या सुरू होण्याला विलंब होत आहे. 

सधन, साखर कारखान्यांचा आणि बागायतदारांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळ तीव्र आहे. शासनाने अकरा तालुक्‍यांत तसेच अन्य तीन तालुक्‍यांतील काही मंडळांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. मात्र, अजून फारशा उपाययोजना केल्या जात नाही. पावसाअभावी आणि साठवण न झाल्याने पाणी पातळी खालावलेली असून पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक गावांनी डिसेंबरपासूनच टॅंकरने पाणी देण्याची मागणी केली आहे. आता जानेवारी संपत आला असून पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. पाणी पातळी वरचेवर खालावत असल्याने लोकांत चिंता व्यक्त केली जात आहे. 

सध्या जिल्ह्यामध्ये तीनशे सहा गावे आणि दीड हजार वाड्या वस्त्यांवरील सहा लाख ७३ हजार ५३० लोक दुष्काळाच्या झळा सोसत असून या गावांना ३७१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. अजूनही टॅंकरची मागणी वाढत आहे. पाणी पातळी खालावत असल्याने नागरिकांत चिंता व्यक्त केली जात असून काही भागात टॅंकर भरण्यासाठीही पाणी उपलब्ध होण्याला अडचणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. जनावरांच्या छावण्या सुरू होण्याला उशीर होत आहे.

चारा वाहतुकीस बंदी   नगरसह राज्याच्या अनेक भागांत चाराटंचाई निर्माण झालेली आहे. जिल्ह्यामधील चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेता आगामी काळात अडचणी आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला प्रतिबंध केला असून जिल्हाधिकाऱ्यांनी तसा आदेश काढला आहे. दोन महिन्यांसाठी हा आदेश असेल असे नमूद केले आहे. 

तालुकानिहाय टॅंकर  पाथर्डी ः ११९, संगमनेर ः ३५, कोपरगाव ः २, राहुरी ः १, राहाता ः ३, नगर ः २८, पारनेर ः ७४, शेवगाव ः ३३, कर्जत ः ३९, जामखेड ः २२, श्रीगोंदा ः १५, 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com