agriculture news in Marathi, Nagar election will be highlighted in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

नगरची लढत राहणार लक्षवेधी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मार्च 2019

नगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार जाहीर झाल्याने आता संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतींपैकी एक असलेल्या नगरकडेही राज्याचे लक्ष राहणार आहे. 

राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांतील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघातून लढण्याची वर्षापासून तयारी केली आहे. मात्र आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने डॉ. विखे यांची अडचण झाली.

नगर : राज्याच्या सर्वाधिक लक्ष असलेल्या नगर (दक्षिण) लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार जाहीर झाल्याने आता संग्राम जगताप व डॉ. सुजय विखे पाटील या दोन तगड्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या या लढतींपैकी एक असलेल्या नगरकडेही राज्याचे लक्ष राहणार आहे. 

राज्यातील प्रमुख लोकसभा मतदारसंघांतील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघातून लढण्याची वर्षापासून तयारी केली आहे. मात्र आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने डॉ. विखे यांची अडचण झाली.

त्यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवारी भाजपच्या पहिल्या यादीत डॉ. सुजय यांना उमेदवारी जाहीर झाली, तर राष्ट्रवादीकडून नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे दोन तगडे उमेदवार समोरासमोर आले असून, राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यापेक्षाही आमदार संग्राम जगताप विरुद्ध डॉ. सुजय विखे पाटील अशी, दोन युवा नेत्यांत सरळ लढत होणार आहे.

राज्यातील प्रमुख लढतीपैकी ही एक लक्षवेधी लढत असेल, असे जाणकारांचे मत आहे. आमदार संग्राम जगताप नगर शहराचे आमदार असून, वडील अरुणकाका जगताप हे विधान परिषदेचे आमदार आहेत. संग्राम यांचे सासरे शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे आमदार आहेत.

नगरसेवक, महापौर पदावर काम केल्यामुळे तरुणांची फळी त्यांच्यासोबत आहे. शिवाय मतदारसंघातील श्रीगोंदा तालुक्यात त्यांचे गाव असल्याने तेथेही मोठे प्राबल्य आहे. 
डॉ. सुजय विखे पाटील स्वतः उच्चशिक्षित असून, विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी गेल्या तीन वर्षांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. विखे यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. 

विखे यांच्या बैठका
विधानसभेतील विरोधी पक्षनेते व कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात कोणाचाही प्रचार करणार नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र गेल्या चार दिवसांत पाथर्डी, श्रीगोंद्यासह काही भागांत विखे यांनी बैठका घेतल्या. त्यांच्यासोबत कॉँग्रसचे बरेच नेते होते. त्यामुळे राज्यात कॉँग्रेस-राष्टवादीची आघाडी असली तरी, येथील कॉँग्रेसचे नेते काय करतात याकडेही लोकांचे लक्ष लागले आहे.

आमदार कर्डिलेंची भूमिका महत्त्वाची...! 
नगर लोकसभा मतदारसंघात डॉ. सुजय विखे पाटील यांना भाजपच्या मंडपात आणण्यात आमदार शिवाजी कर्डिले यांची महत्त्वाची भूमिका होती. आता राष्ट्रवादीतर्फे कर्डिले यांचेच जावई आमदार संग्राम जगताप यांची उमेदवारी घोषित केल्याने कर्डिले यांची पंचाईत होईल, असे मानले जात आहे. त्यात नगरमधून मताधिक्‍य मिळविणाऱ्या उमेदवाराची मदार कर्डिले यांच्या भूमिकेवर असेल. 
 


इतर अॅग्रो विशेष
नदी संवर्धनाचा केरळचा आदर्शकेरळ हे भारताच्या दक्षिण टोकाचे एक राज्य. अरबी...
शेतमजुराच्या मुलीने पटकावला ‘शिवछत्रपती...अकोला ः प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एका खेड्यातील...
साडेआठ हजार कोटी खर्चूनही 'जलयुक्त' फेल...मुंबई : फडणवीस सरकारची महत्त्वाकांक्षी जलयुक्त...
पीक विमा योजना यापुढे ऐच्छिक; केंद्र...नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा...
राज्यात तापमानात चढ-उतार शक्यपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
राज्यासह देशात शिवजयंती उत्साहात साजरीपुणे : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी...
शिवरायांची भविष्यवेधी ध्येयधोरणेछत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने रयतेचा राजा...
आपणच आपला करावा उद्धारशेती फायद्याची करायची असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र...
हवामानबदलाशी लढण्यासाठी एक हजार कोटी...पुणे ः जागतिक हवामानबदलाची समस्या संपूर्ण जगासमोर...
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्यापुणे : राज्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याने...
कापसाचे ६४७ कोटींचे चुकारे थकीतअमरावती ः बाजारात दर कोसळल्याने महाराष्ट्र राज्य...
‘पणन’ची कापूस खरेदी उच्चांकी दिशेनेऔरंगाबाद : महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन...
शिवजयंतीनिमित्त मिरवणुकीत ८५ स्वराज्यरथ...पुणे : ‘‘पुण्यात शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
कापूस उद्योगाचे चीनमध्ये पाच हजार कोटी...जळगाव ः देशातील सूत व कापूस गाठींचा मोठा खरेदीदार...
हमीदराने खरेदीसाठी तुरीचे संपूर्ण...वाशीम ः तुरीचे स्वतंत्रपणे पीक घेण्याची पद्धत...
पंधरा लाख कापूस गाठींची खानदेशातील...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
शेतीमाल निर्यातवाढीसाठी सुकाणू समितीची...पुणे : राज्य सरकारने स्वतंत्र कृषी निर्यात धोरण...