agriculture news in marathi, Nagar in Gram per quintal 3750 rupes | Agrowon

नगरमध्ये हरभरा प्रतिक्विटंल ३७५० रुपये

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला ३६५० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मूग, मठ, उडीद, तुरीची आवक होत आहे. मात्र, सर्वसाधारण भुसारची बाजार समितीत सध्या आवक, तसेच भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर आहेत.

नगर ः नगर बाजार समितीत मागील सप्ताहात ४३४ क्विंटल हरभऱ्याची आवक झाली. हरभऱ्याला ३६५० ते ३७५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. मूग, मठ, उडीद, तुरीची आवक होत आहे. मात्र, सर्वसाधारण भुसारची बाजार समितीत सध्या आवक, तसेच भाजीपाल्याची आवक आणि दर स्थिर आहेत.

नगर बाजार गेल्या आठवडाभरात आवकेवर आंदोलनाचा काहीसा परिणाम झाला आहे. ज्वारीची ७४ क्विंटलची आवक झालेली असून, ज्वारीला १९०० ते १९८५ रुपये दर मिळाला. बाजरीची ८९ क्विंटलची आवक झालेली असून, बाजरीला १३५० ते १५५१ रुपये दर मिळाला आहे. मुगाची ८४ क्विंटलची आवक झालेली असून, मुगाला ४०७७ ते ५२५६ रुपये दर मिळाला, तर उडिदाची २९ क्विंटलची आवक होऊन ३५०० रुपये दर मिळाला. गव्हाची आवकही बाजार समितीत बऱ्यापैकी होत आहे. गव्हाची ३३५ क्विटंलची आवक झाली असून, गव्हाला १९०० ते २१७५ रुपये दर मिळाला. मठाची ३० क्विंटलची आवक झाली.

मठाला ५५०० ते ६५०० रुपये दर मिळाला. एक हजार ७७ गुळडागाची आवक झाली. गुळडागाला २६०० ते ३२०० रुपये दर मिळाला. बाजार समितीत कोबी, वांगी, फ्लावर, भुईमूग शेंग, दोडके, भेंडी, टोमॅटो, काकडी, बटाटे, हिरवी मिरची, पालक, मेथी, कोथिंबिरीची बऱ्यापैकी आवक होत आहे. भाजीपाल्याचे दर गेल्या
पंधरा दिवसांच्या तुलनेत स्थिर आहेत. या आठवड्यात झालेल्या अांदोलनामुळे एक दिवस बाजार समितीमधील व्यवहार बंद होते. आंदोलनाचा आवकेवर परिणाम झाला असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
'युरियावरील लिकिंग रोखा'अंमळनेर, जि. जळगाव  ः सध्या रब्बी हंगाम...
थकीत ऊसबिलाप्रश्नी नांदेडमध्ये ...नांदेड ः परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील...
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी भाजपचा...कोल्हापूर  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती शासनाने...अकोला  ः सीताफळ लागवडीची संपूर्ण माहिती...
केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्नांच्या ...मुंबई  ः ‘‘महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न...