agriculture news in marathi, nagar loksabha, Vikhe, Jagtap fight | Agrowon

नगरला प्रचार संपला, पण विकासावर चर्चा नाही
टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 एप्रिल 2019

नगर : पंतप्रधानांसह राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. गेल्या महिनाभरापासून एकमेकांवर जोरदार टीका-टिपन्नी झाली. अखेर प्रचार संपला; पण मतदार संघाच्या विकासावर, सामान्य जनता झळा सोसत असलेल्या दुष्काळावर मते मागतानाही फारशी चर्चा झालीच नाही. 

नगर : पंतप्रधानांसह राज्याच्या राजकारणातील महत्त्वाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. गेल्या महिनाभरापासून एकमेकांवर जोरदार टीका-टिपन्नी झाली. अखेर प्रचार संपला; पण मतदार संघाच्या विकासावर, सामान्य जनता झळा सोसत असलेल्या दुष्काळावर मते मागतानाही फारशी चर्चा झालीच नाही. 

नगर लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपात आघाडीकडे आहे. तो मिळावा यासाठी प्रयत्न करूनही मिळाला नसल्यामुळे येथून लढण्यासाठी हट्टाला पेटलेल्या डॉ. सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राज्याच्या राजकारणात चर्चेत आला. यापूर्वी लोकनेते स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी येथून नेतृत्व केले आहे. डॉ. सुजय हे विधानसभेतील विरोधीपक्ष नेते व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आहेत. ‘राष्ट्रवादीचा प्रचार करणार नाही, मतदारसंघातही प्रचाराला जाणार नाही’, असे त्यांनी सांगितले असले तरी शेवटच्या टप्प्यात ते मुलासाठी प्रचारात सक्रिय झाल्याचे पहायला मिळाले. मात्र आमदार संग्राम जगताप यांना एनवेळी मैदानात उतरवून राष्टृवादीने एकतर्फी वाटणारी निवडणूक ‘कॉंटें की टक्कर’ केली.

नगरची लढत ही राष्टवादी-कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी नसून ती पवार विरुद्ध विखे अशी असल्याचीच चर्चा येथे आहे. डॉ. सुजय यांच्या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, मंत्री पंकजा पालवे, पालकमंत्री राम शिंदे यांच्या सभा झाल्या. संग्राम जगताप यांच्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पक्षाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण, फौजिया खान यांच्या सभा झाल्या.  

दक्षिण लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. यातील तीन जागांवर भाजप, दोन जागांवर राष्ट्रवादी तर एका जागेवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यामुळे नगर शहर विधानसभेची जागा शिवसेनेला किरकोळ फरकाने का होईना गमवावी लागली. या मतदारसंघात युतीचे प्राबल्य दिसत असले तरी कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या सुजय विखेंना सर्वजण मदत करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जाहीर प्रचार संपला असला तरी आता ‘नेते, कार्यकर्ते फुटाफुटीची आणि रात्रीत आर्थिक लाभ’ मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...
जळगाव जामोद येथे फिरते मासळी विक्री...बुलडाणा  : मत्स्यव्यवसाय आणि नियोजन...
साठवणीसाठी खरेदी नसल्याने चीनमध्ये...चीनी आहारामध्ये लसणांचा वापर मोठ्या प्रमाणात होत...
अकोला जिल्हा बँकेची पूरग्रस्तांना १६...अकोला  ः सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील...
शासन हस्तक्षेपाची पोल्ट्री...नागपूर ः खाद्याच्या दरात झालेली वाढ तुलनेत कमी...
सूज, अतिसारावर मायाळू उपयोगी स्थानिक नाव    : मायाळू, भजीचा वेल...
परभणीत काकडी प्रतिक्विंटल ३०० ते ६००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
लोकांशी नीट वागा तरच निवडून याल ः...नगर ः राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता दिली...
लोकांच्या कामात येईल त्या अधिकाऱ्याला...पुणे : ‘‘लोकांचे काहीही काम सांगितले की सरकारी...
कापसाला एक हजार रुपये बोनस जाहीर करा ः...पुणे ः भारतीय कापूस महामंडळाकडे (सीआयआय)...
विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्जमुंबई ः चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी...
पुणे : पाणलोटातील पावसामुळे धरणांतून...पुणे : पुणे जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात गुरुवारी...