नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी उडणार 

राज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होणार आहे.
Nagar Panchayat elections will be in full swing
Nagar Panchayat elections will be in full swing

पुणे  नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होणार आहे. ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांमुळे राजकीय घडमोडीला वेग आला आहे. नगर पंचायतींवर वर्चस्वासाठी त्या-त्या भागातील, मंत्री, आमदार, माजी आमदार व अन्य नेत्यानी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.  राज्यात एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे ८१ नगर पंचायतीची मुदत संपली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने या निवडणुका वरचेवर लांबणीवर पडत होत्या. या शिवाय अजून महिनाभरात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये १८ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. नव्याने सहा नगरपंचायती झाल्या आहेत. अशा एकूण १०५ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रभाग रचना व मतदार यादीच्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास त्या बाबत खातरजमा करून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर दिली आहे.  ग्रामीण भागात ग्रामपंचायती, नगरपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. त्यामुळे निवडणुकीसाठी नेत्यांनी कंबर कसली असून, राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील सत्तेप्रमाणे नगरपंचायतीतही महाविकास आघाडीचे काही ठिकाणी प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकारणानुसार आखाडे बांधले जात आहेत. 

अशी असेल निवडणूक प्रक्रिया  - अंतिम प्रभाग यादी जाहीर करणे ः २९ नोव्हेंबर  - उमेदवारी अर्ज भरणे ः १ ते ७ डिसेंबर २०२१  - उमेदवारी अर्जाची छाननी ः ८ डिसेंबर  - उमेदवारी अर्ज मागे घेणे ः १३ डिसेंबर  - मतदान ः २१ डिसेंबर  - मतमोजणी व निकाल ः २२ डिसेंबर  निवडणूक होत असलेल्या जिल्हानिहाय नगरपंचायती 

नगर ः अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी  औरंगाबाद ः सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित)  ठाणे ः मुरबाड, शहापूर  ःःःःपालघर ः तलासरी, विक्रमगड, मोखाडा,  रायगड ः खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित)  सातारा ः लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी  परभणी ः पालम  बीड ः केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी  रत्नागिरी ः मंडणगड, दापोली  सिंधुदुर्ग ः कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ  पुणे ः देहू (नवनिर्मित)  सांगली ः कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ  सोलापूर ः माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित)  नाशिक निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा  धुळे ः साक्री  नंदुरबारः धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ  जळगावः बोदवड  लातूर ः जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ  उस्मानाबाद ः वाशी, लोहारा बु.  नांदेड ः नायगाव, अर्धापूर, माहूर  हिंगोली ः सेनगाव, औंढा-नागनाथ  अमरावतीः भातकुली, तिवसा  बवलडाणा ः संग्रामपूर, मोताळा  यवतमाळ ः महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी  जामणी  वाशीम ः मानोरा  नागपूर ः हिंगणा, कुही  वर्धा ः कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर  भंडारा ः मोहाडी, लाखनी, लाखांदूर  गोंदिया ः सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली  चंद्रपूर ः पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरार  गडचिरोली ः एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com