Agriculture News in Marathi Nagar Panchayat elections will be in full swing | Agrowon

नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी उडणार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

राज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होणार आहे.

पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु, कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ३२ जिल्ह्यांतील १०५ नगरपंचायतींसाठी २१ डिसेंबरला मतदान तर होणार आहे. ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असलेल्या या निवडणुकांमुळे राजकीय घडमोडीला वेग आला आहे. नगर पंचायतींवर वर्चस्वासाठी त्या-त्या भागातील, मंत्री, आमदार, माजी आमदार व अन्य नेत्यानी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 

राज्यात एप्रिल २०२० ते मे २०२१ या कालावधीत सुमारे ८१ नगर पंचायतीची मुदत संपली होती. मात्र कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने या निवडणुका वरचेवर लांबणीवर पडत होत्या. या शिवाय अजून महिनाभरात म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये १८ ग्रामपंचायतींच्या मुदती संपत आहेत. नव्याने सहा नगरपंचायती झाल्या आहेत. अशा एकूण १०५ नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. प्रभाग रचना व मतदार यादीच्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास त्या बाबत खातरजमा करून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर दिली आहे. 

ग्रामीण भागात ग्रामपंचायती, नगरपंचायतीवर वर्चस्व ठेवण्यासाठी स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते. त्यामुळे निवडणुकीसाठी नेत्यांनी कंबर कसली असून, राजकारण चांगलेच तापू लागले आहे. राज्यातील सत्तेप्रमाणे नगरपंचायतीतही महाविकास आघाडीचे काही ठिकाणी प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकारणानुसार आखाडे बांधले जात आहेत. 

अशी असेल निवडणूक प्रक्रिया 
- अंतिम प्रभाग यादी जाहीर करणे ः २९ नोव्हेंबर 
- उमेदवारी अर्ज भरणे ः १ ते ७ डिसेंबर २०२१ 
- उमेदवारी अर्जाची छाननी ः ८ डिसेंबर 
- उमेदवारी अर्ज मागे घेणे ः १३ डिसेंबर 
- मतदान ः २१ डिसेंबर 
- मतमोजणी व निकाल ः २२ डिसेंबर 

निवडणूक होत असलेल्या जिल्हानिहाय नगरपंचायती 

नगर ः अकोले, कर्जत, पारनेर, शिर्डी 
औरंगाबाद ः सोयगाव, जालना- बदनापूर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी (नवनिर्मित) 
ठाणे ः मुरबाड, शहापूर 
ःःःःपालघर ः तलासरी, विक्रमगड, मोखाडा, 
रायगड ः खालापूर, तळा, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, पाली (नवनिर्मित) 
सातारा ः लोणंद, कोरेगाव, पाटण, वडूज, खंडाळा, दहिवडी 
परभणी ः पालम 
बीड ः केज, शिरूर-कासार, वडवणी, पाटोदा, आष्टी 
रत्नागिरी ः मंडणगड, दापोली 
सिंधुदुर्ग ः कसई-दोडामार्ग, वाभवे-वैभववाडी, कुडाळ 
पुणे ः देहू (नवनिर्मित) 
सांगली ः कडेगाव, खानापूर, कवठे-महाकाळ 
सोलापूर ः माढा, माळशिरस, महाळुंग-श्रीपूर (नवनिर्मित), वैराग (नवनिर्मित), नातेपुते (नवनिर्मित) 
नाशिक निफाड, पेठ, देवळा, कळवण, सुरगाणा 
धुळे ः साक्री 
नंदुरबारः धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ 
जळगावः बोदवड 
लातूर ः जळकोट, चाकूर, देवणी, शिरूर-अनंतपाळ 
उस्मानाबाद ः वाशी, लोहारा बु. 
नांदेड ः नायगाव, अर्धापूर, माहूर 
हिंगोली ः सेनगाव, औंढा-नागनाथ 
अमरावतीः भातकुली, तिवसा 
बवलडाणा ः संग्रामपूर, मोताळा 
यवतमाळ ः महागाव, कळंब, बाभूळगाव, राळेगाव, मारेगाव, झरी 
जामणी 
वाशीम ः मानोरा 
नागपूर ः हिंगणा, कुही 
वर्धा ः कारंजा, आष्टी, सेलू, समुद्रपूर 
भंडारा ः मोहाडी, लाखनी, लाखांदूर 
गोंदिया ः सडकअर्जुनी, अर्जुनी, देवरी, सावली 
चंद्रपूर ः पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही, मुलचेरार 
गडचिरोली ः एटापल्ली, कोरची, अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, धानोरा, कुरखेडा आणि भामरागड 


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...