‘नगर’लोकसभेसाठी अर्ज भरण्यास सुरवात

‘नगर’लोकसभेसाठी अर्ज भरण्यास सुरवात
‘नगर’लोकसभेसाठी अर्ज भरण्यास सुरवात

नगर : नगर लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारपासून (ता. २८) अर्ज भरण्यास जिल्हाधिकारी कार्यालयात सुरवात झाली. यासाठी सहायक निवडणूक अधिकारी अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज दाखल करताना उमेदवारांसह पाच जणांनाच प्रवेश देण्यात येणार असून, परिसरात मोबाईल वापरण्यासही बंदी घालण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेची सर्वांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पत्रकारांना निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी माहिती दिली. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘नगर मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरामध्ये नामनिर्देशन प्रक्रियेच्या दरम्यान फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ लागू करण्यात आले आहे. शंभर मीटरवर बॅरिकेड्‌स लावण्यात येणार आहेत. अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवाराला केवळ तीन वाहने या बॅरिकेड्‌सच्या आतमध्ये आणता येतील. या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. दुपारी अकरा ते तीन यावेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ईव्हीएम, व्हीव्हीपॅटसंदर्भात प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पार पडला आहे. आणखी दोन टप्प्यांत प्रशिक्षण घेतले जाणार आहे. यात कुचराई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.’’

पोलिस अधीक्षक सिंधू म्हणाले, ‘‘नाकाबंदी, ५३५ अवैध धंद्यांवर छापे मारून कारवाई करण्यात आली आहे. कारवाईत सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १६ हजार जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तडीपारीसंदर्भात अनेकांचे प्रस्ताव प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूक मुक्त पार पडण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत.

असा आहे कार्यक्रम अर्ज दाखल करण्यास सुरवात ः २८ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ः ४ एप्रिल अर्जांची छाननी ः ५ एप्रिल अर्ज मागे घेण्याची मुदत ः ८ एप्रिल मतदानाचा दिवस ः २३ एप्रिल मतमोजणी ः २३ मे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com