नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते ११००० रुपये 

नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते ११००० रुपये 
नगरमध्ये चिंच प्रतिक्विंटल ७००० ते ११००० रुपये 

नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात सहा हजार चारशे ७९ क्विंटल चिंचेची आवक झाली. चिंचेला प्रतिक्विंटल सात हजार ते अकरा हजार व सरासरी ९००० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. बाजार समितीत गावराण ज्वारीचीही आवक सुरू झाली आहे. 

नगर बाजार समितीत नगरसह सोलापूर, बीड, औरंगाबाद व पुणे जिल्ह्यांमधील काही भागातून चिंचेची आवक होत असते. गेल्या पंधरा दिवसांपासून चिंचेची आवक वाढली आहे. गावरान ज्वारीची ३१९ क्विंटलची आवक झाली. ज्वारीला २६२५ ते ३०७५ रुपये दर मिळाला. बाजरीची १७ क्विंटलची आवक होऊन १४०० ते २०१८ रुपये दर मिळाला. मुगाची ८४ क्विंटलची आवक होऊन ४७५० ते ५२११ रुपये दर मिळाला. लाल मिरचीची ४९४ क्विंटलची आवक होऊन ७४११ ते ९५७५ रुपये दर मिळाला. गव्हाची १५० क्विंटलची आवक होऊन १९५१ ते २२५० रुपये दर मिळाला. सोयाबीनची ५५ क्विंटलची आवक होऊन ३४०० ते ३५२५ रुपये दर मिळाला. गूळडागाचीही बाजारात बऱ्यापैकी आवक होत आहे. 

गूळडागाची आठवडाभरात ३०८७ क्विंटलची आवक झाली आणि दर प्रतिक्विंटल २६०० ते २८०० रुपये दर मिळाला. हरभऱ्याची ११० क्विंटलची आवक होऊन ३००० ते ४०१५ रुपये दर मिळाला. तर मुगाची ५९ क्विंटलची आवक होऊन ४७५० ते ५२११ रुपये प्रतिक्विटलचा दर मिळाला. भाजीपाल्यात मेथी, कोबी, फ्लावर, बटाटे, सिमला मिरची, हिरवी मिरची, टोमॅटो, गवार, काकडी, शेवगा, कोथिंबीर, पालकची आवक स्थिर असून, दरात मात्र चढ-उतार होत आहे असे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com