फलोत्पादनासाठी अर्ज करण्यात नगर अव्वल

फलोत्पादन
फलोत्पादन

नगर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध योजनांच्या लाभासाठी राज्यभरातून तब्बल ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. राज्यात गतवर्षीच्या तुलनेत अर्ज वाढले आहेत. नगर जिल्ह्यामध्ये मात्र गेल्यावेळीपेक्षा यंदा दहा हजार अर्ज कमी आले आहेत. सर्वात कमी अर्ज नंदुरबारमध्ये आलेले आहेत. सोडतीने लाभार्थी निवड होणार आहे. राज्यात ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. २०१९-२० मध्ये राबविण्यात येत आहे. यातून सुमारे १९ विविध योजनांचा शेतकऱ्यांना अनुदानावर लाभ दिला जातो. गेल्या दोन वर्षांपासून शासन लाभार्थी निवडण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवत आहे. यंदाही ऑनलाइन अर्ज मागविले होते. त्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. ५ एप्रिल ही अंतिम तारीख होती. मात्र, अनेक शेतकऱ्यांना अर्ज करता आले नसल्याने मुदतवाढ करण्याची मागणी वाढत होती. त्यानुसार २२ एप्रिल मुदतवाढ मिळाली होती. त्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे विविध योजनांसाठी तब्बल ४ लाख ४ हजार ४६३ शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्यात नगर अव्वल असून, येथून तब्बल ६४ हजार ५८७ अर्ज आले आहेत. सोडत काढून लाभार्थी निवड केली जाणार आहे. सर्वाधिक अर्ज कांदाचाळीसाठी आहेत. सर्वात कमी १२५९ अर्ज नंदुरबामधून आलेले आहेत. गेल्यावर्षाच्या तुलनेत यंदा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत विविध विविध योजनांसाठी अर्जाची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेतीन लाख अर्ज आलेले आहेत.  

या योजनांसाठी केले आहेत अर्ज रोपवाटिका, अळिंबी उत्पादन प्रकल्प, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन, सामूहिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, संरक्षित शेतीसाठी हरितगृह, ट्रॅक्‍टर (२० अश्‍वशक्ती), पीक संरक्षक उपकरणे, एकात्मिक पॅक हाउस, शीतगृह, पूर्वशीतकरण ग्रह, शीतखोली, एकात्मिक शीतसाखळी, रायपनिंग चेंबर, एकात्मिक पूर्वशीतकरणगृह व शीतखोली (सोलर पॉवरसह) प्राथमिक प्रक्रिया केंद्र, कांदाचाळ, मधुमक्षिका पालन, मधुमक्षिकापालन वसाहत संच. जिल्हानिहाय आलेले अर्ज असे नगर ः ६४५८७, अकोला ः ५१७९, अमरावती ः ५०४९ औरंगाबाद ः ६०३८९, बीड ः २०६७८, भंडारा ः ३२४६, बुलढाणा ः ९१३४, चंद्रपूर ः ६०८१, धुळे ः ४५८२, गडचिरोली ः २८२७, गोंदिया ः ३४८९, हिंगोली ः ३५८९, जळगाव ः ६८८७, जालना ः ५६६९९, कोल्हापूर ः १६४९, लातूर ः ४४४९, नागपूर ः ७७३१, नांदेड ः ४४६३, नंदुरबार ः १२५९, नाशिक ः २६२२४, उस्मानाबाद ः १३००६, पालघर ः २५२३, परभणी ः १४२०५, पुणे ः ९६८३, रायगड ः २२२१, रत्नागिरी ः २८८२, सांगली ः १५४९३, सातारा ः ४५३६, सिंधुदुर्ग ः १३१४, सोलापुर ः २६१०९, ठाणे ः १२७५, वर्धा ः ४७०६, वाशीम ः ३७९७, यवतमाळ ः ४६२३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com