नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंड

नगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत २७ मे रोजी ४० लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यात नगर अर्बन बॅंक अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.
Nagar Urban Bank fined Rs 40 lakh
Nagar Urban Bank fined Rs 40 lakh

नगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) नियमांचे पालन न केल्याचा ठपका ठेवत २७ मे रोजी ४० लाख रुपयांचा दंड केला आहे. आरबीआयच्या नियमांचे पालन करण्यात नगर अर्बन बॅंक अपयशी ठरल्याचे म्हटले आहे.

अर्बन बॅंकेला यापूर्वीही रिझर्व्ह बॅंकेने पाच लाखांचा दंड केला होता. नगर अर्बन बॅंकेची वैधानिक तपासणी आरबीआयद्वारे करण्यात आली होती. त्यामध्ये बॅंकेची ३१ मार्च २०१८ रोजीची आर्थिक स्थिती, आयआरएसी मानदंडांवरील आरबीआय निर्देशांचे पालन न करणे, प्रगती व एक्‍स्पोजर मानदंडांचे व्यवस्थापन व वैधानिक किंवा इतर निर्बंधांचे व्यवस्थापन आणि प्रवेशावरील पोटकायद्यांचे पालन न करणे या बाबी त्यात आढळून आल्या. त्यानुसार बॅंकेला नोटीस बजावण्यात आली.

त्यावर वैयक्तिक सुनावणीच्या वेळी बॅंकेचे लेखी उत्तर आणि तोंडी म्हणणे विचारात घेतल्यानंतर आरबीआय या निष्कर्षापर्यंत पोचली की आयआरएसी मानदंड, व्यवस्थापनविषयक प्रगती आणि एक्‍स्पोजर नॉर्म्स आणि वैधानिक किंवा इतर निर्बंधांवरील आरबीआयच्या निर्देशांचे पालन केले गेलेले नाही. त्यामुळे संबंधित आर्थिक दंड लावण्यात आल्याचे रिझर्व्ह बॅंकेचे मुख्य सरव्यवस्थापक योगेश दयाल यांनी २७ मे रोजी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, बॅंकेच्या अनियमित कारभारामुळे अर्बन बॅंकेवर सध्या प्रशासक कार्यरत आहे. त्यात आता पुन्हा चाळीस लाख रुपयांचा दंड भरण्याची वेळ आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com