नगर झेडपी चारा उत्पादनावर करणार १ कोटी ८२ लाख खर्च 

Nagar zilha parishad One crore 82 lakh will be spent on fodder production
Nagar zilha parishad One crore 82 lakh will be spent on fodder production

नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना व कामधेनू योजनेतून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून चारा उत्पादन घेतले जाणार आहे. त्यासाठी एक कोटी ८२ लाखांचा खर्च होणार आहे. एकूण साधारण सात हजार ९०३ हेक्टर हे चारा उत्पादन घेतले जात असून त्यातून सहा हजार १८० मेट्रीक टन चारा उपलब्ध होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागातून देण्यात आली. 

नगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने गंभीर टंचाईला समारे जावे लागत आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या पशुधनावर झाला असून दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. गेल्या वर्षी तर चाराच उपलब्ध झाला नसल्याने पशुधन मातीमोल दराने विकावी लागली. काही शेतकऱ्यांनी छावण्यात जनावरे जगवली असली तरी मोठ्या आर्थिक अडचणीला समोरे जावे लागले. यंदा मात्र अगदी शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झालेला असल्यामुळे चारा उत्पादनाला महत्त्व दिले जात आहे. 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून गेल्यावर्षी चारा उत्पादनावर मोठा खर्च केला. यंदाही जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून सर्वसाधारण योजनेतून दीड कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी १० लाख व कामधेनू योजनेतून २२ लाख रुपये असे सुमारे एक कोटी ८२ लाख रुपये खर्च करून चारा उत्पादन घेतले जात आहे. मका, बाजरा, न्युट्रीफिडचे बियाणे देण्यासाठी एका शेतकऱ्यांसाठी साधारण दीड हजार रुपये खर्च केला जात आहे. तीन कापणीत प्रती हेक्टरी १०० टनाप्रमाणे बाजरीचे ५४८ टन, प्रती हेक्टरी मक्याचे ६० टनाप्रमाणे १६२० टन तर प्रती हेक्टरी १६० प्रमाणे न्युट्रीफिडचे ४०१२ टन चारा उत्पादन होईल, असे सांगण्यात आले. 

मागेल त्यांचा सहभाग पशुसंवर्धन विभागाकडून दरवर्षी चारा उत्पादन घेतले जाते. अडचणीच्या काळात या चाऱ्याचा बऱ्यापैकी फायदा झाल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. चारा उत्पादनासाठी पशुपालक शेतकऱ्यांना दीड हजार रुपयापर्यंतचे बियाणे मोफत दिली जातात. यंदा शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे त्यासाठी मागेल त्या शेतकऱ्यांना गरजेप्रमाणे व आवडीप्रमाणे बियाणे दिले जात आहेत, असे पशुसंवर्धन विभागातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com