पावसामुळे नागासाक्या धरण ओव्हरफ्लो

नागासाक्या धरण ओव्हरफ्लो
नागासाक्या धरण ओव्हरफ्लो

नाशिक : नांदगाव तालुक्यातील नागासाक्या मध्यम प्रकल्प पावसामुळे ओव्हरफ्लो झाला आहे. दमदार पावसाने पाणलोट क्षेत्रातील जलस्रोत वाहू लागल्याने गेल्या तीन वर्षांपासून कोरडे असलेले नाग्यासाक्या धरण अखेरीस भरले. धरणाच्या सांडव्यावरून पांझण नदीपात्रात पाणी वाहू लागल्याने येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. 

नाग्यासाक्या धरण पूर्ण क्षमतेने न भरल्याने डाव्या उजव्या कालव्यावरील सिंचनक्षेत्राला आवर्तन देताना जलसंपदा विभागाला काटकसर करावी लागत होती. पिण्याच्या पाण्याचे आरक्षण त्यात असल्यामुळे तालुक्यातील बहुतांशी ग्रामीण भागाला टँकरने पाणीपुरवठा याच धरणाच्या मृत साठ्यातून होत असे. मात्र आता धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे नाग्यासाक्या धरण अखेर भरले आहे. त्यामुळे पांझण नदी वाहू लागली आहे. नदीकाठच्या विहिरी व अन्य लहान मोठ्या पाणी योजनांना त्यामुळे मोठा फायदा होणार आहे.

मालेगाव तालुक्यातील जेऊर, पाथर्डे, साकोरी, मळगाव, निमगुले आदी तर नांदगाव तालुक्यातील वाखारी, पिंप्राळे, साकोरा आदी गावांतील एकूण दोन हजार हेक्टरातील सिंचन क्षेत्राला या धरणातील पाण्यामुळे लाभ होणार आहे. यापूर्वी झालेल्या पावसामुळे तालुक्यातील माणिकपुंज धरणासह अन्य लहान बंधारे भरून वाहू लागले असले तरी नागासाक्या धरणात मात्र अपेक्षित असा जलसंचय झालेला नव्हता. मात्र, आता पावसाने धरण ओव्हरफ्लो झाल्याने लाभधारक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com