agriculture news in Marathi, Nagative networth of 11 cooperative banks in state, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

राज्यातील ११ जिल्हा बँकांचे ‘नेटवर्थ निगेटिव्ह’

तात्या लांडगे
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

राज्यातील ज्या जिल्हा बॅंकांचे  नेटवर्थ निगेटिव्ह आहे अथवा स्वनिधी नाही, शेती कर्जवाटप बंद आहे, अशा ११ बँकांचा वापर बिझनेस करस्पाँडंट म्हणून करण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्य बॅंकेने नाबार्डकडे पाठविला आहे. शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या या जिल्हा बँकांचे  नेटवर्थ सुधारून त्यांना पुनर्जिवित करण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव पाठविला असून आचारसंहितेनंतर त्यावर निर्णय अपेक्षित आहे.
- विद्याधर अनासकर, अध्यक्ष, राज्य बॅंक, महाराष्ट्र

सोलापूर : शेतकऱ्यांची बॅंक म्हणून ओळख असलेल्या राज्यातील ११ जिल्हा बॅंकांचे कर्जवाटप मागील आठ- दहा वर्षांपासून ठप्पच आहे. त्यामुळे उंबरठे झिजवूनही बळिराजाला कर्ज मिळत नसल्याने ज्या बॅंकांचे  नेटवर्थ (नक्तमूल्य) निगेटिव्ह आहे अथवा मागील आठ-दहा वर्षांपासून शेती कर्जवाटप बंद असलेल्या अशा जिल्हा बॅंकांचा वापर बिझनेस करस्पाँडंट म्हणून करण्याचा प्रस्ताव राज्य बॅंकेने राष्ट्रीय स्तरावर नाबार्डकडे पाठविला आहे. 

राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत सर्वाधिक शेती कर्जवाटप करणाऱ्या जिल्हा बँकांचे कर्जवाटप ठप्प आहे. सोलापूर, नांदेड, जळगाव, जालना, बीड, उस्मानाबाद, नागपूर, नाशिक, वर्धा, परभणी व अन्य एका जिल्हा बँकेची सद्यस्थितीत शेती व बिगरशेतीची सुमारे २१ हजार कोटींची थकबाकी आहे. दुष्काळ अन्‌ अडचणीतील कारखानदारीमुळे कर्जवसुली ठप्प आहे. काही बँकांनी नेटवर्थ निगेटिव्ह असल्याने व स्वनिधी नसल्याने ठेवीतील पैशाला हात लावला आहे.

सोलापूर जिल्हा बॅंकेचे नेटवर्थ पॉझिटिव्ह असून ठेवीही वाढल्या आहेत मात्र, नव्या शेतकरी सभासदांना आठ वर्षांपासून कर्जवाटप बंदच आहे. अशा बॅंकांना पुनर्जिवित करण्याच्या उद्देशाने राज्य बॅंकेने या बँकांचा वापर ‘बिझनेस करस्पाँडंट’ (व्यावसायिक प्रतिनिधी) म्हणून करण्याचा प्रस्ताव नाबार्डला दिला आहे. त्यानुसार राष्ट्रीय स्तरावर याबाबत धोरण निश्‍चित केले जात असून जून २०२० पर्यंत मान्यता मिळेल आणि प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल, असा विश्‍वासही सूत्रांनी व्यक्‍त केला.

ठळक बाबी...

  • जिल्हा बॅंकांना कर्जप्रकरणांची शिफारस, कर्जाचे अर्ज स्वीकारण्यावर १ टक्‍का मिळणार कमिशन
  • वाटप केलेल्या कर्जाची वसुली वेळेवर झाल्यास राज्य बॅंक देणार ०.५० टक्‍के कमिशन
  • जिल्हा बँकांच्या इमारती व कर्मचाऱ्यांचा उपयोग राज्य बॅंक कर्जवाटप अन्‌ वसुलीसाठी करणार
  • स्वनिधीचा अभाव अन्‌ निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या बॅंका करतील बिझनेस करस्पाँडंट म्हणून काम
  • आचारसंहितेनंतर जूनपर्यंत नाबार्डकडून निर्णय अपेक्षित : अडचणीतील जिल्हा बॅंकांना बाहेर काढण्याचे नियोजन

 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सून मालदिवात दाखल; १ जूनलाच केरळात...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) सोमवारपर्यंत...
भारतीय किसान संघामार्फत शेतकऱ्यांनी...कोल्हापूर: भारतीय किसान संघाने लॉकडाउनच्या काळात...
लॉकाडाउनमध्येही शेतकऱ्यांकडून शेतमालाची...पुणे (प्रतिनिधी)ः कोरोना टाळेबंदी मध्ये शेतमालाची...
खानदेशात साठा वाढल्याने कापूस, सरकी...जळगाव : कापसाची शासकीय खरेदी खानदेशात मागील ६ मे...
राज्यातील २८० बाजार समित्या अडचणीत;...लातूर ः राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा...
उष्णतेच्या लाटेमुळे अकोल्यात केळीचे घड...अकोला  ः जिल्ह्यात या आठवड्यात वाढलेल्या...
विदर्भात टोळधाडीची दहशत कायम;...नागपूर ः अमरावती जिल्ह्यातील पुसला गावातून...
राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान;...पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने...
मॉन्सून ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
एसटीव्दारे शेतीमाल वाहतूक सुरु...पुणे  ः ‘कोरोना’मुळे महाराष्ट्र राज्य परिवहन...
तंत्रज्ञान आत्मसात करीत प्रयोगशील शेतीत...अकोला जिल्ह्यातील आस्टुल येथील संतोष घुगे यांनी...
मॉन्सूनची अंदमानात चाल;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
टोळधाडीकडून भाजीपाल्याचे सर्वाधिक...नागपूर : राजस्थान, मध्यप्रदेशनंतर टोळधाडीचा...
उन्हाच्या झळांनी काहीली वाढली पुणे : सुर्य चांगलाच तळपत असल्याने...
केळी ‘रायपनिंग चेंबर’ व्यवसाय झाला पूरक...सातारा जिल्ह्यातील अनवडी (ता. वाई) येथील प्रवीण...
अंदमानात उद्या मॉन्सूनची प्रगती शक्य पुणे: बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’...