हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेम

हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेम
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेम

नागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या आवकेचा अपवाद वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमाल व भाजीपाल्याची आवक जेमतेम असल्याची स्थिती आहे. खरिपातील नव्या शेतीमालाची आवक होईपर्यंत परिस्थिती अशीच राहणार असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

कळमणा बाजारात हरभऱ्याची १०३५ क्‍विंटल आवक झाली. गेल्या आठवड्यात हरभऱ्याचे दर ४००० ते ४३१४ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हरभऱ्याचे दर ४००० ते ४२२६ रुपयांवर पोचले. सरबती गव्हाची बाजारातील आवक ४५० ते ५०० क्‍विंटल आहे. गव्हाचे दर २५०० ते २८०० रुपये होते. लुचई तांदळाची आवक अवधी ५० क्‍विंटलची, तर दर २२०० ते २५०० रुपयांप्रमाणे होते. ५२७५ ते ५७५० रुपये क्‍विंटलचा दर तुरीला गेल्या आठवड्यात होता. ५२०० ते ५७६० रुपये असा दर तुरीला या आठवड्यात मिळाला. तुरीची आवकदेखील १२० क्‍विंटलचीच आहे. सोयाबीनची आवक १४० क्‍विंटलची, तर दर ३२०० ते ३५८० रुपये क्‍विंटलचे होते.

अशी आहे फळांची आवक बाजारात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांचे दर ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५ क्‍विंटलचीच झाली. केळी ४५० ते ५५० रुपये क्‍विंटल आणि आवक १०० क्‍विंटल, द्राक्ष ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक तीन क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. आंबा आवक ८ क्‍विंटल आणि दर ३००० ते ४००० रुपये होते. 

भाजीपाल्याचे दर स्थिर वाळलेल्या मिरचीची ५०० क्‍विंटलची आवक, तर दर ८००० ते ११००० रुपयांवर स्थिर होते. टोमॅटो २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल आणि आवक १५० क्‍विंटल, कोथिंबिरीच्या दरात आलेली तेजी कमी झाली असून, ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. कारली २२०० ते २६०० रुपये, काकडी १२०० ते १६०० रुपये, गाजर १८०० ते २२०० रुपये, पालक १५०० ते १६०० रुपये, फणस ५०० ते ७०० रुपये, ढेमसे २५०० ते ३०००, चवळी भाजी १२०० ते १६०० रुपये क्‍विंटल होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com