Agriculture news in Marathi, Nagpur in commodity Incoming confined | Agrowon

हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

नागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या आवकेचा अपवाद वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमाल व भाजीपाल्याची आवक जेमतेम असल्याची स्थिती आहे. खरिपातील नव्या शेतीमालाची आवक होईपर्यंत परिस्थिती अशीच राहणार असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

नागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या आवकेचा अपवाद वगळता कळमणा बाजार समितीत इतर शेतीमाल व भाजीपाल्याची आवक जेमतेम असल्याची स्थिती आहे. खरिपातील नव्या शेतीमालाची आवक होईपर्यंत परिस्थिती अशीच राहणार असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

कळमणा बाजारात हरभऱ्याची १०३५ क्‍विंटल आवक झाली. गेल्या आठवड्यात हरभऱ्याचे दर ४००० ते ४३१४ रुपये क्‍विंटल होते. या आठवड्यात हरभऱ्याचे दर ४००० ते ४२२६ रुपयांवर पोचले. सरबती गव्हाची बाजारातील आवक ४५० ते ५०० क्‍विंटल आहे. गव्हाचे दर २५०० ते २८०० रुपये होते. लुचई तांदळाची आवक अवधी ५० क्‍विंटलची, तर दर २२०० ते २५०० रुपयांप्रमाणे होते. ५२७५ ते ५७५० रुपये क्‍विंटलचा दर तुरीला गेल्या आठवड्यात होता. ५२०० ते ५७६० रुपये असा दर तुरीला या आठवड्यात मिळाला. तुरीची आवकदेखील १२० क्‍विंटलचीच आहे. सोयाबीनची आवक १४० क्‍विंटलची, तर दर ३२०० ते ३५८० रुपये क्‍विंटलचे होते.

अशी आहे फळांची आवक
बाजारात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांचे दर ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक ५ क्‍विंटलचीच झाली. केळी ४५० ते ५५० रुपये क्‍विंटल आणि आवक १०० क्‍विंटल, द्राक्ष ४००० ते ५००० रुपये क्‍विंटल आणि आवक तीन क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. आंबा आवक ८ क्‍विंटल आणि दर ३००० ते ४००० रुपये होते. 

भाजीपाल्याचे दर स्थिर
वाळलेल्या मिरचीची ५०० क्‍विंटलची आवक, तर दर ८००० ते ११००० रुपयांवर स्थिर होते. टोमॅटो २५०० ते ३००० रुपये क्‍विंटल आणि आवक १५० क्‍विंटल, कोथिंबिरीच्या दरात आलेली तेजी कमी झाली असून, ३५०० ते ४००० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला. कारली २२०० ते २६०० रुपये, काकडी १२०० ते १६०० रुपये, गाजर १८०० ते २२०० रुपये, पालक १५०० ते १६०० रुपये, फणस ५०० ते ७०० रुपये, ढेमसे २५०० ते ३०००, चवळी भाजी १२०० ते १६०० रुपये क्‍विंटल होते.


इतर बाजारभाव बातम्या
राज्यात बोरं ८०० ते ४००० रुपये...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
सांगलीत कांदा ३५०० ते १०१११ रुपये...सांगली : येथील विष्णू अण्णा पाटील फळे व भाजीपाला...
सोलापुरात टोमॅटो, वांगी, बटाट्याचे दर...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
सोलापुरात कांद्याच्या दरातील तेजी...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात टोमॅटोची आवक वाढतीचकोल्हापूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत या...
पुण्यात पालेभाज्यांसह कांद्याच्या आवकेत...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
सोलापुरात दरवाढीनंतर कांद्याच्या आवकेत...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत पेरू १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात काकडीला ५०० ते २००० रुपये दरअकोला येथील बाजारात गुरुवारी (ता. ५) काकडीची...
सोलापुरात कांद्याला २० हजार कमाल दर सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
कापसाची ४९०० ते ५००० रुपये दरात खेडा...जळगाव  ः राज्यात कापूस पट्ट्यात कापसाचे दर...
जळगावात भरताची वांगी १८०० ते ३५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ४...
सांगलीत गूळ सरासरी ३४६० रुपये सांगली :  येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी...
कोल्हापुरात टोमॅटोच्या आवकेत वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...
औरंगाबाद : बाजरी, सोयाबीनचे दर स्थिर;...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांसह शेवगा, बीटच्या...पुणे ः अवकाळी पावसामध्ये खरिपातील...
औरंगाबादेत गाजर २००० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत मेथी जुडी प्रतिशेकडा ६०० ते १०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...