Agriculture news in marathi Nagpur continues to improve the price of tur | Agrowon

नागपुरात तुरीच्या दरातील सुधारणा कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जुलै 2020

नागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये तूरीच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात तूरीचे दर ४८५० ते ५७०० रुपये क्विंटलवर होते.

नागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये तूरीच्या दरात सुधारणा अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात तूरीचे दर ४८५० ते ५७०० रुपये क्विंटलवर होते. या आठवड्यात दरांत तेजी नोंदविण्यात आली.

४८५० ते ५९०१ रुपये या दराने तूरीचे व्यवहार झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रक्रिया उद्योगाची मागणी वाढल्याने दरात सुधारणा झाल्याची माहितीही देण्यात आली.

कळमणा बाजार समितीत तूरीची सरासरी आवक ४०० ते ७०० क्विंटलची आहे. गेल्या आठवड्यात तूरीचे दर ५७०० नंतर ५५११ असे झाले होते. त्यात पुन्हा सुधारणा होत दरांत तेजी अनुभवली जात आहे. बाजारातील तूरीची आवकही ७०० क्विंटलवर स्थिरावल्याचे सांगण्यात आले. 

कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत तूरीने गेल्या आठवड्यात ६००० रुपये क्विंटलचा पल्ला गाठला होता. प्रक्रिया उद्योगाकडून वाढलेली मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे दरात तेजी आली आहे. त्यानंतर मात्र दरात घसरण होत तूरीचे दर ५४५० ते ५७९० वर पोचले. अमरावती बाजार समितीत हेच दर ५४०० ते ५७०० रुपये क्विंटल होते. नागपूर बाजार समितीत गव्हाची  आवक नियमीत आहे. १६५० ते १८१० रुपये असा गव्हाचा दर होता. या आठवड्यात हे दर १६०० ते १७५६ वर पोचले. गव्हाची आवक १००० क्विंटलची राहिली. 

हरभरा आवक १५०० क्विंटलच्या घरात आहे. या आठवड्यात हरभरा दर ३६०० ते ४२५० रुपये आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर ३५५० ते ४१०० रुपये असे होते. त्यामुळे हरभरा दरांत सरासरी १०० रुपयाची तेजी नोंदविण्यात आली आहे.

 बाजारात भुईमूग शेगांची आवक गेल्या आठवड्यात २० क्विंटलवरुन या आठवड्यात ८० क्विंटलर पोचली. ४००० ते ४२०० रुपये असा दर शेंगांचा होता. 

या आठवड्यात दरात तेजी येत ४२०० ते ४५०० रुपयांवर ते पोचले. दोनशे रुपयांची सरासरी वाढ भुईमूंग शेंगाच्या दरात नोंदविली गेली. 

मोसंबीची आवक नियमीत

सोयाबीन दर स्थिर असून गेल्या आठवड्यात ३३०० ते ३६४५ रुपये असा  दर होता. तोच दर या आठवड्यातही कायम राहिला. सोयाबीनची आवक ११०२ क्विंटलची आहे. बाजारात डाळिंबांची आवक २४६१ क्विंटलची आहे. डाळिंबांचे दर २००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. कांदा आवक १००० क्विंटल आणि दर ८०० ते १००० रुपये क्विंटल आहे. बटाटा आवक ३००२ क्विंटलची, तर दर २००० ते २३०० रुपये होते.

टोमॅटोला ३८०० ते ४०० रुपयांचा दर मिळत आहे. आवक ११० क्विंटलची नोंदविण्यात आली. बाजारात मोठ्या आकाराच्या मोसंबी फळांची आवक ५०० क्विंटलच्या घरात आहे. गेल्या आठवड्यात मोसंबीचे दर २००० ते २१०० रुपये होते. तेच दर या आठवड्यात कायम असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
जळगावात मेथी २००० ते ३५०० रुपये जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये वांगी २००० ते ५००० रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
जळगावात गवार २५०० ते ४००० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी (...
सोलापुरात ढोबळी मिरची, टोमॅटो दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये हिरवी मिरचीला मागणी...नाशिक : येथील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कांदा, बटाट्याच्या दरात सुधारणा,...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत हिरवी मिरची प्रतिक्विंटल...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत काकडी ६०० ते १२०० रुपये क्विंटलपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
राज्यात उडीद २५०० ते ८००० रूपयेनगरमध्ये ४५०० ते ५५०० रूपये नगर  : नगर...
नाशिकमध्ये कारले १००० ते २६६७ रूपयेनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (ता.८...
जळगावात आले ३५०० ते ५२०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर बाजार समितीत कांद्याचे दर टिकूननगर ः नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर गेल्या पंधरा...