नागपुरात टोमॅटो प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये

नागपुरात प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये
नागपुरात प्रतिक्‍विंटल १००० ते १२०० रुपये

नागपूर ः कळमणा बाजार समितीत टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात मात्र टोमॅटो ६० ते ७० रुपये किलोने विकला जात आहे.

नागपूरच्या कळमणा बाजार समितीत विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळसह नजीकच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा भागातून देखील टोमॅटोची आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगीतले. गेल्या आठवडाभरात टोमॅटोचे दर १००० ते १२०० रुपये क्‍विंटलवर स्थिरावले होते.

१८ ऑगस्ट रोजी दरात तेजी येत हे दर १६०० ते २००० रुपये क्‍विंटलवर पोचले. त्यानंतर १४०० ते १८०० रुपयांचा दर टोमॅटोचा होता. त्यानंतर दरात घसरण सुरू झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. ८०० ते ११०० रुपये क्‍विंटलचा दर २० ऑगस्ट रोजी टोमॅटोला होता. २१ ऑगस्ट रोजी पुन्हा दर १००० ते १४०० रुपये क्‍विंटलवर पोचले. टोमॅटोची रोजची सरासरी आवक १५० क्‍विंटल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com