agriculture news in marathi Nagpur Mandarin Farmers company exports sixty to Orange, Santra, Amravati | Agrowon

शेतकरी कंपनीने केली ६० टन संत्रा निर्यात

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 डिसेंबर 2020

नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ६० टन संत्रा निर्यात करण्यात आली. त्याकरिता स्थानिकांकडून सरासरी १५ ते ३८ रुपये प्रति किलो या दराने संत्रा खरेदी करण्यात आला.
 

अमरावती :  नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ६० टन संत्रा निर्यात करण्यात आली. त्याकरिता स्थानिकांकडून सरासरी १५ ते ३८ रुपये प्रति किलो या दराने संत्रा खरेदी करण्यात आला.

नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने सालबर्डी येथील नव्या संत्रा ग्रेडिंग व वॕक्सिन प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे. या प्रकल्पात पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर ग्रेड ‘ए’ दर्जाचा संत्रा निर्यात केला जातो. या वर्षी नैसर्गिक कारणांमुळे संत्रा फळांवर अपेक्षित रंगछटा चढली नाही. शेतकऱ्यांना अवघा सात ते दहा रुपये किलोचा दर मिळत आहे. मागणी नसल्याचे कारण देत अनेक व्यापाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे खरेदी करार देखील रद्द केले आहेत. त्यामुळे ६० टक्के संत्रा तोडणीविना झाडावरच आहे.

अशा अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनीने काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कंपनीच्या माध्यमातून प्रकल्पस्थळी संत्रा खरेदी करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना नागपूरच्या कळमना बाजार समितीत विक्रीसाठी संत्रा नेण्यासाठीचा वाहतूक खर्च वाचला. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून प्रतिटन शंभर किलो कटनी घेतली जाते. ती देखील शेतकऱ्यांना द्यावी लागली नाही. अशा प्रकारचा शेतकऱ्यांचा छुपा ३० टक्के खर्च वाचण्यास मदत झाली. 

या वर्षीच्या हंगामात कंपनीकडून १६०० टन संत्रा खरेदी करण्यात आला. खरेदी करण्यात आलेले आलेल्या संत्र्याची किंमत अडीच कोटी रुपयांच्या घरात आहे. मुंबई येथील एका निर्यातदारांकडून शेतकरी उत्पादक कंपनीशी निर्यातक्षम फळांचा पुरवठा करण्यासंदर्भात करार करण्यात आला. या माध्यमातून आजवर सुमारे २ कंटेनर दुबईला पाठविण्यात आले. त्याद्वारे ६० टन संत्रा निर्यात करण्यात आली. तिसरा कंटेनर मुंबई मार्गे पुन्हा दुबईला पाठविण्यात येणार आहे. या वेळी देखील २० टन संत्रा निर्यात केला जाईल. 

प्रतिक्रिया...
नागपूर मँडरींन शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने नव्या ग्रेडिंग, वॅक्सिंन प्रकल्प भाडेतत्त्वावर घेण्यात आला आहे, त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यातील प्रक्रिया करण्यात आली. शेतकरी कंपनीच्या माध्यमातून मुंबई येथील निर्यातदाराच्या सहकार्याने आजवर ६० संत्रा निर्यात करण्यात आली. गुरुवारी पुन्हा २० टनांचा कंटेनर दुबईला पाठविण्यात येणार आहे. निर्यातक्षम संत्रा खरेदी स्थानिक शेतकऱ्यांकडून करण्यात आली त्यासाठी त्यांना सरासरी १५ ते ३० रुपये किलो असा दर देण्यात आला आहे. बाजारात आजच्या घडीला सात ते दहा रुपये असा दर आहे.
- नीलेश रोडे, अध्यक्ष, नागपूर मँडरीन शेतकरी उत्पादक कंपनी , संपर्क : ९४२०७ २१०१७


इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...