मसालावर्गीय पिकांसह भाजीपाला पिकांनी खाल्ला भाव
मसालावर्गीय पिकांसह भाजीपाला पिकांनी खाल्ला भाव

मसालावर्गीय पिकांसह भाजीपाला पिकांनी खाल्ला भाव

नागपूर ः पावसाने खंड दिल्याच्या परिणामी कळमणा बाजार समितीत मसालावर्गीय शेतमालासह भाज्यांच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कोथिंबिरीचे दर सामान्यांच्या आवाक्‍याबाहेर गेले असतानाच वाळलेली मिरचीदेखील भाव खावून जात आहे. मिरचीचे दर ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलवर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.  

पूर्व विदर्भात सर्वदूर पावसाने दडी मारली आहे. परिणामी, भाजीपाला आणि मसालावर्गीय शेतमालाचे दर चांगलेच वधारले आहेत. बाजारात सुकी मिरचीची आवक सरासरी ५०० क्‍विंटलच्या घरात आहे. ही आवक मध्यंतरी १००० क्‍विंटलपर्यंत पोचली होती. आवकमध्ये चढउतार होत असतानाच मिरचीचे दर मात्र, गेल्या महिनाभरापासून स्थिर आहेत. ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलने सुक्‍या मिरचीचे व्यवहार होत असल्याची माहिती देण्यात आली. बाजारात लसूणदेखील स्थिर असून सरासरी ३००० ते ८००० रुपये असा दर आहे. काही दिवस लसणाचे दर ४००० ते ८००० रुपये क्‍विंटल असे होते. 

बाजारात कोथिंबीर सर्वात जास्त भाव खावून जात आहे. कोथिंबिरीची आवक जेमतेम १२० ते १२५ क्‍विंटल अशी आहे. कोथिंबिरीला विक्रमी ८००० ते १०००० रुपये क्‍विंटलचा दर गेल्या आठवड्यात होता. त्यानंतर कोथिंबिरीचे दर १५ हजार रुपये क्‍विंटलवर पोचले. या आठवड्यात हे दर ६००० ते १० हजार रुपये क्‍विंटलवर पोचले आहेत. हिरव्या मिरचीची आवक ११० ते ११५ क्‍विंटलची असून दर गेल्या आठवड्यात ४५०० ते ५००० रुपये क्‍विंटलचे होते. 

या आठवड्यात हिरव्या मिरचीचे व्यवहार त्याच दराने झाले. ढोबळ्या मिरीची बाजारात नियमित आवक असून ती १५० क्‍विंटल सरासरी आहे. ढोबळ्या मिरचीला गेल्या आठवड्यात २५०० ते ३००० रुपये क्‍विंटलचा दर होता. या आठवड्यात २८०० ते ३२०० रुपयांपर्यंत ते पोचले. गाजर १५०० ते २००० रुपये क्‍विंटलवरुन या आठवड्यात १३०० ते १७०० रुपये क्‍विंटलवर घसरले. गाजराची आवक ९० ते १०० क्‍विंटलची आहे. 

बाजारात फणस दरात चढउतार अनुभवले जात आहेत. १२०० ते १५०० आणि आता १००० ते १५०० रुपये क्‍विंटलने फणसाचे व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. पालकदेखील भाव खावून जात असून २५०० ते ३५०० रुपये क्‍विंटलचा दर पालकाला होता. पालकाची सरासरी आवक ९५ ते १०० क्‍विंटलची आहे. लिंबू ३००० ते ३५०० रुपये क्‍विंटल तर आवक १४२ क्‍विंटलची आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com