नागपूरी संत्र्याला बांगलादेशी दराचा गोडवा

नागपूरी संत्र्याला बांगलादेशी दराचा गोडवा
नागपूरी संत्र्याला बांगलादेशी दराचा गोडवा

अमरावती : कोरोनाच्या परिणामी मुख्य आयातदार असलेल्या बांगलादेशमधूनही नागपुरी संत्र्याची मागणी वाढली आहे. ११०० ते १२०० टका (बांगलादेशी चलन) प्रतिक्रेटचा दर तेथे होता. आता प्रतिक्रेट २००० टकाप्रमाणे संत्रा विक्री त्या ठिकाणी होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

नागपुरी संत्र्याचा मोठा आणि एकमेव आयातदार, अशी बांगलादेशची ओळख आहे. बांगलादेशमध्ये मासांहार अधिक होतो. हे जेवण पचविण्यासाठी व्हिटॅमीन सी असलेल्या संत्रा फळांचे सेवन केले जाते. त्यामुळेच नागपुरी संत्र्यासाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ म्हणून गेल्या अनेक वर्षांत नावारूपास आली आहे. सरासरी ३०० टन रोजची याप्रमाणे हंगामात भारतातून बांगलादेशला निर्यात होते. या हंगामात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संत्रा निर्यात दुपटीने वाढल्याचे सांगण्यात आले. बांगलादेशच्या १०० टक्यास भारतीय रुपयांमध्ये ८५ रुपये होतात. आयात शुल्क अधिक असल्याने नागपुरी संत्र्याचा दुय्यम दर्जाचा माल बांगलादेशच्या बाजारपेठेत पोचतो. आता ५५० ते ६०० टनाची रोजची निर्यात बांगलादेशला होत आहे. त्या ठिकाणी सुरुवातीला ११०० ते १२०० टका याप्रमाणे प्रतिक्रेटचे दर होते. त्यात वाढ होऊन ते थेट २००० टकापर्यंत पोचले आहेत.

...असा मोजतात संत्रा आकार वीस किलोमध्ये १४१, १७१, १९१, २०५ आणि २२५ याप्रमाणे फळे बसतात. त्यानुसार १४१ ते २२५ दाणा असा आकार संत्र्याचा समजला जातो. त्यानुसार साधारणतः २०५ दाणा फळे बांगलादेशला निर्यात होतात. २२५ आकाराच्या फळांचे ३० ते ३५ टक्‍के उत्पादन राहते. अशी आहे निर्यात राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या आकडेवारीनुसार चौथ्या प्रतीच्या संत्र्याची २०० टनांपर्यंत निर्यात बांगलादेशला होते. ही निर्यात एकूण साडेसहा ते सात लाख टनांच्या तुलनेत ३० टक्‍के इतकी आहे. मृग व आंबिया बहारातील संत्र्याचा त्यामध्ये समावेश आहे. प्रतिक्रिया... बांगलादेश हा नागपुरी संत्र्याचा मुख्य आयातदार आहे. हंगामात त्या भागातील व्यापारी प्रक्रिया उद्योजकांशी संपर्क साधतात. त्याच ठिकाणावरून पॅकिंग करून ट्रकव्दारे थेट बांगलादेशला माल पाठविला जातो. सुरुवातीला ३०० टनांची रोजची आवक होती. कोरोनामुळे ती वाढीस लागून ५५० ते ६०० टन रोजची निर्यात होत आहे. त्या ठिकाणी दरातही तेजी आली आहे. - नीलेश रोडे, संचालक,  नव्या ऑरेंज प्रोसेसिंग प्लॅंट, सालबर्डी, मोर्शी, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com