Agriculture news in marathi In Nagpur, the price of trumpets continued to rise | Agrowon

नागुपरात तुरीच्या दरातील तेजी कायम

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 जुलै 2020

नागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये तूरीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात तूरीचे दर ४९०० ते ५७०० रुपये क्विंटलवर होते.

नागपूर ः कळमणासह विदर्भातील बहूतांश बाजार समित्यांमध्ये तूरीच्या दरात तेजी अनुभवली जात आहे. कळमणा बाजार समितीत गेल्या आठवड्यात तूरीचे दर ४९०० ते ५७०० रुपये क्विंटलवर होते.

या आठवड्यात दर अल्पशी घसरण नोंदविण्यात आली. ४८०० ते ५६०१ रुपये या दराने तूरीचे व्यवहार झाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रक्रिया उद्योगाची मागणी वाढल्याने दरात तेजी आल्याची माहितीही देण्यात आली.

कळमणा बाजार समितीत तूरीची सरासरी आवक ८०० ते १००० क्विंटलची आहे. गेल्या आठवड्यात तूरीचे दर ५७०० नंतर ५५११ असे झाले होते. त्यात पुन्हा सुधारणा होत दर  ४८०० ते ५६०१ रुपयांवर स्थिर आहेत. बाजारातील तूरीची आवकही १००० क्विंटलवर स्थिरावल्याचे सांगण्यात आले. कारंजा (जि. वाशीम) बाजार समितीत तूरीने गेल्या आठवड्यात ६००० रुपये क्विंटलचा पल्ला गाठला होता. प्रक्रिया उद्योगाकडून वाढलेली मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे दरात तेजी आली आहे. 

गव्हाची बाजारातील आवक नियमीत आहे. १६५० ते १८१० रुपये असा गव्हाचा दर होता. या आठवड्यात गव्हाचे दर १६०० ते १८५६ वर पोचले. गव्हाची आवक १००० क्विंटलची राहिली. हरभरा आवक २५०० क्विंटलच्या घरात आहे. दर ३६०० ते ४१०० रुपये आहेत. गेल्या आठवड्यात हेच दर ३६०० ते ४२२८ रुपये असे होते. त्यामुळे हरभरा दरात १०० रुपयाची तूट नोंदविण्यात आली आहे. 

भुईमूग शेगांची आवक २० क्विंटलवरुन ८० क्विंटलर पोचली. ४००० ते ४२०० रुपये असा दर शेंगांचा होता. दरात तेजी येत ४२०० ते ४५०० रुपयांवर ते पोचले. दोनशे रुपयांची सरासरी वाढ त्यांच्या दरात नोंदविली गेली. सोयाबीन दर स्थिर असून गेल्या आठवड्यात ३२५० ते ३७०० रुपये असा दर होता. हाच दर सोयाबीनला कायम राहिला. सोयाबीनची आवक ११०२ क्विंटलची आहे. 

डाळिंबांची आवक १५०४ क्विंटलची आहे. दर २००० ते ६००० रुपयांवर स्थिर आहेत. कांदा आवक ४००० क्विंटल आणि दर ४०० ते ५०० रुपेय क्विंटल. बटाआ आवक ६००२ क्विंटलची तर दर ८०० ते ९०० रुपये होते. टोमॅटोला ४००० ते ४५०० रुपयांचा दर मिळत आवक १५० क्विंटलची नोंदविण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सततच्या पावसाने मुगाचे...नगर  ः नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून...
नांदेड जिल्ह्यात साडेसात लाख हेक्टरवर...नांदेड ः यंदा नांदेड जिल्ह्यातील खरिपाच्या पेरणी...
पुणे जिल्ह्यात भात लागवडीसाठी पट्टा...पुणे  ः चालू वर्षी खरीप हंगामात ड्रम सीडर...
दोंडाईचा मालधक्क्यावर अधिकाऱ्यांच्या...धुळे ः युरिया वितरणातील घोळ, शेतकऱ्यांच्या...
नगर जिल्ह्यात फळबाग लागवड वाढण्याचा...नगर  ः यंदा पाऊस चांगला, शिवाय मागील काही...
कोल्हापुरात अर्धा टक्के शेतकऱ्यांनी ...कोल्हापूर : राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेला...
रत्नागिरी जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाची...रत्नागिरी  ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण...
अकोला जिल्ह्यातील दोन लाखांवर ...अकोला  : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
नागपूर कृषी महाविद्यालय राबवणार ‘ई-...नागपूर  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन...
उभ्या पिकात मूलस्थानी जलसंवर्धनकोरडवाहू शेतीमध्ये जमिनीतील पाण्याची कमतरता पाहता...
दूध प्रश्न बाजूला; शेतकरी संघटनांमधील...कोल्हापूर  : दूध दरप्रश्नी सरकारवर दबाव...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा संतुलित; दर...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
घरोघरी असावी पोषण परसबागपरसबागेचा आकार हा जागेची उपलब्धता, कुटुंबातील...
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक;...मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या...
अपचन, खोकला, कफावर गुणकारी पिंपळी पावडर आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळींना पिंपळी नक्कीच...
मागण्यांसाठी मराठवाड्यात दूध...औरंगाबाद : दूध उत्पादन खर्चाच्या तुलनेत परवडणारा...
नैसर्गिकरीत्या वाढवा रोगप्रतिकारक शक्तीरोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच शरीरात बाहेरून प्रवेश...
परभणी जिल्ह्यात रास्ता रोको, दूध संकलन...परभणी : दूध दरवाढीसाठी भाजपतर्फे शनिवारी (ता.१)...
दूध दरप्रश्नी आंदोलनाला विदर्भात...नागपूर : दूध दरप्रश्नी भाजपच्या वतीने...
दूध दरप्रश्नी भाजपचे सातारा जिल्ह्यात...सातारा  : गाईच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये...