agriculture news in marathi, nagpur region become on top in transcript digitization,maharashtra | Agrowon

नागपूर विभागाची सात-बारा डिजिटायझेशनमध्ये आघाडी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 जुलै 2018

तलाठी, तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी अशा तीन टप्प्यांवर पडताळणी करून ऑनलाइनची प्रक्रिया त्रुटीरहीत करण्यासाठीचे काम झाले. त्यामुळे ऑनलाइन सात - बारा बिनचूक उपलब्ध होणार आहे. डिजिटल स्वाक्षरीचे देखील ६० टक्‍के पूर्णत्वास गेले आहे. एकूणच डिजिटलायझेशनची प्रक्रिया ९९.२२ टक्‍के पूर्णत्वास गेली असून या प्रक्रियेत सहा जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळाले आहे. यापुढील काळात शेतकऱ्यांना ऑनलाइन सात -बारा काढण्याची सुविधा मिळेल.
- अनुपकुमार, विभागीय आयुक्‍त, नागपूर.

नागपूर  : पूर्व विदर्भात येणाऱ्या सहा जिल्ह्यांमध्ये ६५ तालुके आणि आठ हजार ५८७ गावे आहेत. यामध्ये ३१ लाख ५० हजार ७ इतके सर्व्हे क्रमांक आहेत. यातील बहुतांश खातेदारांचे सात-बारा ऑनलाइन करण्यात यश आले असून त्याची टक्‍केवारी ९९.२२ आहे. वरोरा आणि चंद्रपूर तालुक्‍यातच तांत्रिक कारणामुळे हे काम प्रभावित झाले आहे.

एक ऑगस्टपासून ऑनलाइन सातबाराची उपलब्धता करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यानुसार नागपूर विभागात रेकॉर्ड ऑनलाइनची करण्याची बहुतांश प्रक्रिया झाली आहे, परंतु डेटा एका सर्व्हरवरून दुसऱ्या सर्व्हरवर ट्रार्न्सफर करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ही तारीख चुकण्याची शक्‍यता आहे. डेटा ट्रान्सफर झाल्यानंतर डिजिटल स्वाक्षरीचे काम केले जाईल. त्यानंतर शेतकऱ्यांना ऑनलाइन सातबाराची उपलब्धता होणार आहे.

सध्या शेतकरी सात -बारा ऑनलाइन काढून त्यावर तलाठ्याची सही घेतात. परंतु या कारणामुळे कोठेही खरिप हंगामातील पीककर्ज वितरणाची प्रक्रिया बाधित झाल्याच्या तक्रारी नाहीत. महसूल प्रशासनाने या हंगामात काही जिल्ह्यांमध्ये दस्तऐवज थेट  शेतकऱ्यांना घरपोच देण्यासाठी पुढाकार घेतला. गोंदिया, भंडारा जिल्हयात हे काम अतिशय प्रभावीपणे झाले. ऑनलाइन सातबाराची प्रक्रिया राबविण्यापूर्वी त्यावरील आक्षेप व त्रुटींचे वाचन झाले चंद्रपूर व वरोरा येथे ऑनलाइन सातबाराचे काम रखडले आहे.


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...