agriculture news in marathi In Nagpur, soybeans fetch double the guaranteed price | Agrowon

नागपुरात सोयाबीनला हमीभावापेक्षा दुप्पट दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 जून 2021

नागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. कळमना बाजार समितीत हमीभावापेक्षा दुपटीने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत.

नागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम आहे. कळमना बाजार समितीत हमीभावापेक्षा दुपटीने सोयाबीनचे व्यवहार होत आहेत. विदर्भातील सोयाबीनचे हब असलेल्या वाशिम जिल्ह्यातही सोयाबीन आठ हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे.  मागील वर्षी हमीभाव दर तीन हजार ८८० रुपये होता.

प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी वाढल्याने विदर्भात सोयाबीन दरात तेजी आली आहे.  वाशीम, कारंजा, अमरावती, यवतमाळ तसेच नागपूरच्या कळमना बाजार समितीत सोयाबीन सात हजार रुपये क्विंटलने विकले जात आहे. कळमना बाजार समितीत सोयाबीनची जेमतेम २३२ क्विंटल आवक होत आहे.

गेल्या आठवड्यात सोयाबीनचे दर ६५०० ते ७१५० होते. या आठवड्यात सोयाबीन दरात काहीशी घसरण होऊन ६००० ते ६६०० रुपयांवर दर पोचले. सोयाबीनची नवी आवक येण्यास अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे दरातील तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली. 

या पुढील काळात देखील सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांच्या खाली राहणार नाही, असे सांगण्यात आले. भुईमूग शेंगांना ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दर आहे. गेल्या हंगामात भुईमुगाला पाच हजार रुपयांपर्यंत दर मिळाला होता. या वर्षी मात्र शेंगांची गुणवत्ता नसल्याचे कारण सांगत व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात आहे. शेंगांची आवक १५० क्विंटल इतकी जेमतेम आहे. 

कळमना बाजार समितीत ज्वारीची अवघी तीन क्विंटल आवक झाली.  २२०० ते ३००० रुपयांचा दर ज्वारीला होता. बाजारातील गव्हाची आवक ८०० क्विंटलच्या आसपास आहे. गव्हाचे दर १६५० ते १७८२ रुपये होते. तांदळाची आवक २४ क्विंटल, तर दर ५००० ते ५५०० रुपये होते. हरभऱ्याची आवक ८८४ क्विंटल, तर दर ४१०० ते ४६९६ होते. मुगाचे दर ५२०० ते ५४०० रुपये आणि आवक पाच क्विंटल होती.

 बाजारात केळीची आवक ५५ क्विंटल आणि दर ४५० ते ५५० रुपये क्विंटल होता. द्राक्षाची आवक ६५ क्विंटल, तर दर ४००० ते ५००० रुपये होता. डाळिंबांचे दर दोन हजार ते ६ हजार रुपये क्विंटल आणि आवक ९६० क्विंटल होती. चिकूची आवक ६० क्विंटल, तर दर १००० ते दोन हजार रुपयांवर स्थिर आहे. 

आंबा आवक ३ हजार क्विंटल अणि दर १३०० ते २००० रुपये होते. बटाट्याची आवक ५५०० क्विंटल होती. बटाट्याचे दर ११०० ते १३०० रुपयांवर होते. 

मोसंबीची नियमित आवक

कळमना बाजार समितीत सद्यस्थितीत मोसंबीची सरासरी ३०० क्विंटल आवक होत आहे.  गेल्या आठवड्यात मोठ्या आकाराच्या फळांना ४ हजार ते सहा हजार रुपये क्विंटल दर होता. या आठवड्यात देखील मोसंबीचे दर स्थिर असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये डाळिंबाच्या आवकेत वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरला वाटाणा, भेंडीच्या दरात सुधारणा;...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरातील घोडदौड कायम नागपूर ः प्रक्रिया उद्योजकांची मागणी वाढल्याने...
पावसाच्या उघडिपीमुळे भाजीपाला आवकेत वाढपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात कांदा क्विंटलला ३०० ते २३००...पुण्यात प्रतिक्विंटलला १५०० ते २००० रुपये पुणे...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक वाढली; दरात घटनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नगरमध्ये शेवग्याला २००० ते ४५०० रुपये दरनगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात आले, टोमॅटो दरांत सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात घेवडा १५०० ते ६५०० रुपयेसांगलीत प्रतिक्विंटलला २००० ते २५०० रुपये...
‘लॉकडाउन’चे निर्बंध शिथिल;  अकोल्यात... बोर्डी, जि. अकोला : कोरोनाची दुसरी लाट...
नगरला शेवगा, घेवड्याला चांगला दर; आवक...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
नाशिकमध्ये डाळिंबांची आवक वाढली; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
कळमना बाजार समितीत सोयाबीन दरातील...नागपूर : सोयाबीन दरातील सुधारणा कायम आहे. कळमना...
राज्यात वांगी ५०० ते ४००० रुपये क्विंटलपुण्यात प्रतिक्विंटलला १००० ते २००० रुपये...
पुण्यात भाजीपाल्याची आवक संतुलितपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात केळी ६०० ते १५०० रुपयेसांगलीत क्विंटलला १२५० ते १३५० रुपये ...
नगरमध्ये शेवग्यासह दोडका दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
कळमण्यात मोसंबीला ५००० ते ६५०० रुपयेनागपूर : कळमना बाजार समितीत सद्यःस्थितीत मोसंबीची...
हिरवी मिरची, कोबी, मटारच्या दरात वाढ  पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...