agriculture news in Marathi Nagpuri Orange will be export to Dubai Maharashtra | Agrowon

नागपुरी संत्र्याची होणार दुबईला निर्यात

विनोद इंगोले
मंगळवार, 14 जानेवारी 2020

अमरावती : शासन, प्रशासन आणि संस्थात्मकस्तरावर संत्रा निर्यातीचा अपेक्षित पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे या सर्वांच्या सहभाग आणि मदतीशिवाय आता संत्रा उत्पादकांनीच थेट निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आणि राज्यात दिशादर्शक ठरू पाहणारी ही संत्रा निर्यात याच महिन्यात २० ते २२ जानेवारी दरम्यान होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अमरावती : शासन, प्रशासन आणि संस्थात्मकस्तरावर संत्रा निर्यातीचा अपेक्षित पल्ला गाठता आला नाही. त्यामुळे या सर्वांच्या सहभाग आणि मदतीशिवाय आता संत्रा उत्पादकांनीच थेट निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. देशात आणि राज्यात दिशादर्शक ठरू पाहणारी ही संत्रा निर्यात याच महिन्यात २० ते २२ जानेवारी दरम्यान होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 राज्यात द्राक्ष, आंब्याची निर्यात होते. परंतु, अपेक्षित राजाश्रय न मिळाल्याने आणि स्थानिक नेतृत्वाच्या उदासिनतेमुळे संत्रा मात्र निर्यातीच्या बाबतीत पिछाडला. राजकीयच नाही तर प्रशासकीय पातळीवर देखील संत्रा उत्पादकांना ही अनास्था भोगावी लागली. संत्रा निर्यात होणारच नाही हे अपेक्षित धरून अपेडाकडून देखील ‘सिट्रसनेट’ हा गेटवेदेखील इतकी वर्ष सुरू करण्यात आला नव्हता. सगळीकडून अशाप्रकारे नैराश्‍य होते. 

दरम्यान, संत्रा उत्पादकांची ही घुसमट लक्षात घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भाने पाठपुरावा केला.  वित्त मंत्रालय तसेच अपेडास्तरावर पाठपुरावा करीत त्यांनी ‘सिट्रसनेट’ हा गेटवे सुरू करण्यास बाध्य केले. एवढ्यावरच न थांबता अपेडाच्या माध्यमातून निर्यातीकरिता पूरक सुविधांच्या उपलब्धतेसाठीही पाठपुरावा चालविला आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच संत्रा निर्यातीच्या हालचालींना वेग आला आहे. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी देखील निर्यातीला प्रोत्साहन देण्याकरिता सातत्याने याविषयांवरील कार्यशाळांवर भर दिला आहे. 

पहिला कंटेनर जाणार दुबईला
ना नफा ना तोटा तत्त्वावर संत्र्याचा १७ टन क्षमतेचा एक कंटेनर दुबईला पाठविण्यासाठी एका स्थानिक निर्यातदाराने संमती दर्शविली आहे. ५० शेतकरी आपल्याकडे उपलब्ध निर्यातक्षम संत्रा याकरिता देतील. त्यासाठीच्या खर्चाचा भार शेतकरी स्वतःच उचलणार आहेत. अमरावती व नागपूर जिल्ह्यांतील शेतकरी यात सहभागी होणार आहेत. २० ते २२ जानेवारी या कालावधीत संत्र्याची खेप रवाना होईल, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे. अपेडाची मदत या उपक्रमासाठी घेण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले. वाराणसीतून अशाच प्रकारे मिरची निर्यातीचा उद्देश साधण्यात शेतकऱ्यांना यापूर्वी यश आले आहे.


इतर बातम्या
नरनाळा किल्ला पर्यटन विकासासाठी...अकोला  : अकोला जिल्ह्याच्या सर्वसाधारण...
पीक फेरपालटातून रोगांचा प्रादुर्भाव...येत्या हवामान बदलाच्या काळामध्ये कीड आणि रोगांचा...
मंगळवेढ्यात डाळिंबाच्या सौद्यांना...मंगळवेढा, जि. सोलापूर : मंगळवेढा कृषी उत्पन्न...
अकोला जिल्ह्यातील सात गावे झाली ‘...अकोला  ः जिल्ह्यातील सात गावांची राज्य...
वाशीम जिल्ह्यात ७७७ कोटींंची कर्जमुक्ती...वाशीम : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कृषी...नाशिक : ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्न...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
सांगलीत ‘माणगंगा’वर ताब्याच्या...सांगली : आटपाडीतील माणगंगा सहकारी साखर...
सोलापूर जिल्हा नियोजन आराखड्यात ७४.४५...सोलापूर : जिल्ह्याच्या सन २०२०-२०२१ च्या जिल्हा...
सूक्ष्म सिंचन साधनांमुळे आदिवासी शेतकरी...हिंगोली : ‘‘वसंतराव नाईक मराठावाडा कृषी...
मोर्शी येथे ‘कामदार’ कार्यालयाचे उद्‌...अमरावती  ः शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रश्‍न...
प्राप्त निधी वेळेत खर्च करा : भुजबळ नाशिक : ‘जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत प्राप्त...
सोलापूरजिल्ह्याच्या ३४९.८७ कोटींच्या...सोलापूर : जिल्ह्यासाठी २०२०-२१ या आर्थिक...
सांगली जिल्ह्यातून डाळिंब निर्यातीसाठी...सांगली ः जिल्ह्यातून गतवर्षी ८०० टन डाळिंबाची...
खानदेशात रब्बीचे क्षेत्र दुप्पटजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामाची स्थिती...
‘व्हीएसआय’ची आंतरराष्ट्रीय साखर परिषद...पुणे: वसंतदादा साखर संस्थेच्या वतीने आयोजित...
वाघाच्या बंदोबस्तासाठी गावकऱ्यांचा...भंडारा  ः वाघाच्या दहशतीमुळे शेतीकामे...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यात झपाट्याने घटऔरंगाबाद : ऑक्‍टोबरमध्ये हिटऐवजी पावसाचे आगमन...
धोरणात्मक निर्णय, सिंचनाच्या सुविधेमुळे...नवी दिल्ली: धोरणात्मक निर्णय आणि पुढाकार;...
इथेनॉल प्रकल्पासाठी ३६ कारखान्यांनाच...नवी दिल्ली: पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल...