मुंबई ः येत्या सोमवारपासून नागपूर येथे सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्त
ताज्या घडामोडी
खरसुंडीत पशुधन अधिकारी नावालाच
खरसुंडी, जि. सांगली ः येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहायक पशुधन अधिकारी नावालाच आहेत. दवाखाना व जनावरांवर उपचार परिचर करीत आहे. सहा गावांतील शेतकऱ्यांना पशुधनावर उपचारासाठी खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा आधार घ्यावा लागत आहे. ‘पशुधन अधिकारी नावाला एक दिवस ही नाही कामाला अशी स्थिती पशुवैद्यकीय दवाखान्याची झाली आहे.
खरसुंडी, जि. सांगली ः येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात सहायक पशुधन अधिकारी नावालाच आहेत. दवाखाना व जनावरांवर उपचार परिचर करीत आहे. सहा गावांतील शेतकऱ्यांना पशुधनावर उपचारासाठी खासगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांचा आधार घ्यावा लागत आहे. ‘पशुधन अधिकारी नावाला एक दिवस ही नाही कामाला अशी स्थिती पशुवैद्यकीय दवाखान्याची झाली आहे.
येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ आहे. सहायक पशुधन अधिकारी एक, परिचर एक अशी दोघांची नेमणूक आहे. खरसुंडी, चिंचाळे, वलवण, धावडवाडी, घाणंद, मिटकी अशी सहा गावे पशुवैद्यकीय दवाखान्यात अंतर्गत आहेत. सहा गावांत २१ हजार ९९१ पशुधन आहे. खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ चा असूनही सहायक पशुधन अधिकारी आठवड्यातून एखादा दिवस कधी येतात, कधी जातात हे कळत नाही. शेतकऱ्यांना पत्ता देखील लागत नाही. परिचरच्या सांगण्यावरून फोन केला तर फोन कायम बंद असतो. परिचर रोज नियमित दवाखान्यात हजर राहतो. पशुधनांवर उपचारही तोच करतो. डॉक्टर हजर राहत नसल्याने नाईलाजाने शेतकऱ्यांना उपचार करून घ्यावे लागतात.
सहायक पशुधन अधिकाऱ्यांना दोन महिन्यांपूर्वी पशुधन अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली. त्यांचा निवृत्त होण्याचा कालावधी नऊ महिने राहिला आहे. निवृत्ती जवळ आल्याने ते कधी येतात, कधी जातात. मदतीला असलेले परिचर त्यांच्या सांगण्यावरून काम करतात. अधिकारीच हजर राहत नसल्याने डॉक्टर बनून ते उपचार करीत आहेत. या दवाखान्यात तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी मिळणार का? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. खरसुंडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ चा होण्यासाठी बऱ्याच वेळा प्रयत्न करण्यात आले. जिल्हा प्रशासनाने अद्याप लक्ष दिले नाही.
खरसुंडी पशुवैद्यकीय दवाखान्यात सहायक पशुधन अधिकारी म्हणून निवासी स्वरूपात नेमणूक आहे. सध्या ते हजर राहत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. जिल्हा पातळीवरील वरिष्ठांनी लक्ष देऊन निवासी पशुधन अधिकारी द्या.
-सौ. लता पुजारी, सरपंचदोन दिवसांपूर्वी माझा अपघात झाला. त्यामुळे मी दीड महिना रजेवर आहे. त्यानंतर उर्वरित कायर्काळात पशुवैद्यकीय दवाखाना सुरू राहील.
- बी. आर. कदम, सहायक पशुधन अधिकारी
- 1 of 587
- ››